Photo Credit -X

IAS Pooja Khedkar Family Absconding: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar)पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांचा हातात बंदूक घेत शेतकऱ्याला धमकावल्याचा एक जुना व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर  पुणे ग्रामीणचे पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, घरी कोणीच नव्हते. एसपी पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपी फरार आहेत, पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. तसेच घरी कोणी नाही' असे पोलिसांनी म्हटले.  (हेही वाचा:IAS Officer Puja Khedkar यांच्या आईचा अरेरावीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुण्यातील मुळशी येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून केली दमदाटी (Viral Video) )

पोस्ट पहा:

'आम्ही त्यांच्या निवासस्थानी पोहोचण्याचाही प्रयत्न केला पण ते तेथे नव्हते. स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह अनेक पथके त्यांचा शोध घेत आहेत. ते हाती आल्यास त्यांची चौकशी करू आणि त्यानुसार कारवाई करू, असे एसपी पंकज देशमुख यांनी म्हटले. पूजा खेडकर यांच्या आईवर 323, 504, 506कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून Arms Act चा देखील उल्लेख आहे.