IAS Officer Puja Khedkar Mother Viral Video (PC - X/@ivaibhavk)

IAS Officer Puja Khedkar Mother Viral Video: वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. पूजा खेडकर यांनी गुरुवारी विदर्भातील वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्यावर भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये पद मिळविण्यासाठी शारीरिक अपंग श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्यातील लाभांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना पत्र लिहून खेडकर यांना प्रशासकीय गुंतागुंत टाळण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात पोस्टिंगची विनंती केल्यानंतर खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली.

दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. ज्यात कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी आक्रमक वागणूक, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या अँटी चेंबरवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे, स्वत:च्या ऑडी कारवर लाल दिवा लावणे यासारख्या उल्लंघनांचा समावेश आहे. दरम्यान, केंद्राने खेडकर यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. (हेही वाचा - Notice to Trainee IAS Officer Pooja Khedkar: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला पुणे वाहतूक पोलिसांनी पाठवली नोटीस; खाजगी वाहन आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे आदेश)

एका निवेदनात केंद्राने म्हटले आहे की, महाराष्ट्र केडरचे वाटप झालेल्या 2023 बॅचच्या अधिकाऱ्याचे उमेदवारी दावे आणि इतर तपशिलांची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी केली जाईल. ही समिती दोन आठवड्यांत आपला अहवाल सादर करेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (हेही वाचा - Probationary IAS Officer Puja Khedkar Case: घर, कार, स्वतंत्र कार्यालय...; प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या व्हॉट्सॲप चॅटद्वारे केलेल्या मागण्या उघड)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आयएएस अधिकाऱ्याची आई मनोरमा खेडकर एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावताना दिसत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, खेडकर कुटुंबाने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली आहे. कथितरित्या, त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने आक्षेप घेतल्यानंतर मनोरमा खेडकर बाऊन्सर घेऊन आल्या आणि बंदुकीचा धाक दाखवत त्यांना धमकावले. धक्कादायक बाब म्हणजे, शेतकऱ्यांनी पुण्यातील पौड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, वरच्या दबावामुळे त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही.