Notice to Trainee IAS Officer Pooja Khedkar: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला पुणे वाहतूक पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पूजाने आपल्या आऊडी कारवर लाल-निळ्या रंगाचा दिवा आणि व्हीआयपी नंबर प्लेट लावली होती. तसेच तिच्या या खाजगी कारवर 'महाराष्ट्र शासन' बोर्ड असल्याचेही आढळून आले होते. आता सदर खाजगी वाहनावर मोटार वाहन कायदा कलम 177 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या गाडीचे बिलही शुल्क न भरता प्रलंबित आहे. आता वाहतूक पोलिसांनी पुजाला नोटीस पाठवली असून, पुढील कायदेशीर तपासणीसाठी सदर खाजगी वाहन आवश्यक कागदपत्रांसह चतुश्रृंगी परिवहन विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहर, चतुश्रृंगी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक शफील पठाण यांनी याबाबत माहिती दिली. (हेही वाचा: Shivneri Passenger Arrested: शिवनेरी बसमध्ये बसमध्ये सह प्रवाशाला अंमली पदार्थ पाजून लुटणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)