Black Fungus च्या उपचारासाठी किंमतीत घट करण्याची मागणी, ऐवढा येतो खर्च
Black fungus (Photo Credits-Facebook)

देशभरात कोरोनानंतर आता ब्लॅक फंगस च्या रुग्णांमध्ये ही वाढ होत चालली आहे. 50 टक्क्यांपर्यंत मृत्यू दर असणारा या आजाराला रोखणे मुश्किल झाले आहे. याच्या उपचाराठी येणारा मोठा खर्च चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चात घट करावी अशी मागणी केली जात आहे. देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वाधिक मोठी संस्था CAIT यांच्याकडून ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी घट करण्यासंदर्भातील एक पत्र लिहिण्यात आले आहे. कैट कडून केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मंडविया यांना पत्र लिहित जरुरीच्या औषधांच्या किंमती कमी कराव्यात अशी पत्रात मागणी केली आहे.

कैट यांनी असे म्हटले आहे की, ब्लॅग फंगसचा उपचार अधिक खर्चिक आहे. त्यामुळे तो सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी कामी येणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत जवळजवळ सात हजार रुपये आहे.अशातच हा दीर्घकाळ राहणारा आजार त्यासाठी व्यक्तिला जवळजवळ 7 ते 100 इंजेक्शनची गरज भासते. त्याचा खर्च उचलणे प्रत्येक व्यक्तिला परवडणारा नाही आहे.(White Fungus: देशात ब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाईट फंगस’चे संकट; Mucormycosis पेक्षा आहे अधिक धोकादायक )

कैटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेवाल यांनी असे म्हटले आहे की, आधीच कोरोनाची परिस्थिती आणि रोजगारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच हा नवा आजार आणि त्यासाठी लाखो रुपयांचा येणारा खर्च पाहता अधिकच नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे या आजाराठी लागणाऱ्या औषधांच्या किंमती कमी केल्या पाहिजेत.

मॅक्स हेल्थकेअरचे वरिष्ठ कंसल्टेंट डॉ. निशेष जैन यांनी असे म्हटले की, ब्लॅक फंगसवरील उपचार महाग आहे. कारण यावरील इंजेक्शन हे रुग्णाच्या वजनानुसार तयार केले जाते. यामध्ये देण्यात येणाऱ्या अम्फोटेरेसिन बी लाइपोसेमल इंजेक्शचे प्रमाण तीन ते पाच एमजी प्रति किलोग्रॅम वजनाच्या हिशोबाने दिले जाते. अशातच एखाध्या व्यक्तिचे वजन 60 किलो आहे त्याला रोज तीन एमजी दिले जात असल्यास त्याला प्रतिदिन 180 एमजी द्यावे लागणार आहे.

पुढे जैन यांनी म्हटले की, ब्लॅक फंगस फक्त डोळ्यांपर्यंत राहत नाही तर नाक आणि मेंदू पर्यंत त्याचा प्रभाव होतो. रुग्णाचे दररोज चेकअप करावे लागते आणि त्यानुसार त्याचे औषधाचे डोस वाढवले जातात. काही रुग्णांवर दोन-दोन महिने सुद्धा उपचार करण्यात येत असल्याचे जैन यांनी म्हटले आहे. अशातच इंजेक्शनची वाढती मागणी पाहता याच्यावरील उपचारासाठी सुद्धा अधिक खर्च येत आहे.