अग्निपथ । PC: AIR News Mumbai

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून भरती प्रक्रियेमध्ये आज मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. लष्करभरतीसाठी आता केंद्र सरकारने 'अग्निपथ योजना' जाहीर केलेली आहे. दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी आज त्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लष्करात भरति होणार्‍या युवकांना 'अग्नीवीर' म्हटलं जाणार आहे. हे अग्नीवीर आयटीआय आणि अन्य टेक्निकल इन्स्टिट्युशन द्वारा देखील भरती केले जाऊ शकतात. लष्करभरतीसाठी उमेदवारांचे किमान वय कमी करण्याचा देखील विचार प्रस्तावाधीन असल्याची माहिती मिळाली आहे. हे देखील नक्की वाचा: Sarkari Naukari Update: मोदी सरकार पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्याच्या तयारीत; PM Narendra Modi यांचे मंत्रालयांना निर्देश .

पहा योजना काय?

काय आहेत अग्निपथ योजनेची वैशिष्ट्यं?

  • अग्निपथ योजनेद्वारा युवक 4 वर्षांसाठी सेनेत सहभागी होऊ शकतो.
  • चार वर्षांच्या शेवटी जवळजवळ 80% सैनिकांना ड्यूटीतून मुक्त केले जाईल. पुढे सादर केले जातील पुढील रोजगाराच्या संधींसाठी सशस्त्र दलाकडून मदत मिळेल.
  • चार वर्षांनंतरही केवळ 20 टक्के जवानांना संधी मिळणार आहे. मात्र, त्यावेळी देखील सैन्यभरती असल्यासच हे शक्य होईल.
  • योजनेंतर्गत सशस्त्र दलांचे युवा प्रोफाइल तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तरुणांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • चार वर्षांची नोकरी सोडल्यानंतर तरुणांना सेवा निधी पॅकेज देण्यात येणार आहे.

दरम्यान यामध्ये 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण हे 10 आठवडे ते 6 महिन्यांचे असेल. 10/12वीचे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. अग्निवीरांची पहिली भरती ९० दिवसांची असेल. देशसेवेदरम्यान कोणत्याही अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना व्याजासह सेवा निधीसह 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा केली जाणार आहे. अग्नीपथ द्वारा महिलांचा देखील लष्करात समावेश करून घेतला जाणार आहे.