5 लाख  वरून 7 लाखावर टॅक्स भरावा लागणार नाही.  मध्यमवर्यीयांसाठी मोठी घोषणा  आज केंद्रीय  अर्थमंत्र्यांनी केली आहे.  हे नव्या टॅक्स रिजीम साठी आहे.  

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल 30 लाख रुपये गुंतवणूक करण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 15 लाख होती. म्हणजे आता दुपट्टीने अधिक पैसे गुंतवले जाऊ शकतात.

यंदाच्या वर्षी 6.4% वित्तीय तूट राहण्याची शक्यता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

महिला सन्मान बचत पत्र ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महिला, मुली कमाल 2 वर्षासाठी 2 लाखापर्यंत गुंतवणुकीची मुभा, 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये  तरूणांना मिळणार AI, Drone तंत्रज्ञांनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सेंद्रीय शेतीचा स्वीकार करावा यासाठी 1 कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. येत्या 3 वर्षामध्ये ही  ही मद्ता दिली जाणार आहे.

AI हे भविष्य आहे हे ओळखून आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्ससाठी सेंटर फॉर एक्सलन्सची स्थापना  होणार  असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचा निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे. यासोबतच 50 अतिरीक्त विमानतळ, हेलिपोर्टचा विकास केला जाणार आहे अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

एकलव्य मॉडेल स्कूलसाठी एकलव्य निवासी शाळेच्या माध्यमातून आदिवासी मुलांना शाळेची दारं खुली केली जाणार आहेत.  त्यासाठी 3 वर्षात  38,800  शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.

Load More

मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प (Budget) आज (1 फेब्रुवारी) मांडला जाणार आहे. त्यामुळे सार्‍या देशवासियांचे त्याकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आज संसदेमध्ये अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचे वाचन सुरू होईल. दरम्यान काल आर्थिक सर्वेक्षणामध्ये 2023-24 चा विकासदर 6.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही मागील 3 वर्षामधील सर्वात कमी वाढ आहे. चालू आर्थिक वर्षातील विकास तर 7 टक्के असेल असा अंदाज आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्याने हा मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. शेतकरी, सर्वसामान्य या अर्थसंकल्पाकडून आशा ठेवून आहेत. नोकरदारांनाही इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये सूट मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांनाही या बजेट कडून अपेक्षा आहेत. इंधन दर ते खाद्यपदार्थांचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार पावलं उचलणार का? याकडे त्यांचं लागलं आहे. तरूणवर्गाला नव्या नोकरीच्या संधी, स्टार्टअप साठी सरकार काही मदत करणार का? याचे वेध लागले आहे. इथे पहा थेट प्रक्षेपण .

वाहतूक आणि दळणवळण यांना चालना देण्यासाठी मागील काही बजेट मध्ये मोठे हायवे, वंदे भारत ट्रेन्स आणि उडाण प्रोजेक्ट अंतर्गत विमानतळं जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पाहता मुंबई, पुणे, नाशिक शहरामध्ये काही मोठ्या प्रोजेक्ट्सची घोषणा होणार का? याकडे लक्ष असेल.