Indian Republic Day 2021 Chief Guest म्हणून ब्रिटीश पंतप्रधान Boris Johnson यांनी स्वीकारलं आमंत्रण
Boris Johnson (Photo Credits: Getty Images)

ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन ( Boris Johnson) यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिन 2021 (Indian Republic Day 2021)  चं मुुख्य अतिथी म्हणून येण्याचं आमंत्रण स्वीकारलं आहे. काही वेळापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाकडून त्याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षी पंतप्रधानपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर प्रथमच बोरिस जॉन्सन भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. 26 जानेवारी दरवर्षी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वाजारोहण करून हा सोहळा साजरा केला जातो. दरम्यान 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी देशात सुरू झाली.

Reuters ला प्रतिक्रिया देताना त्यांनी भारत भेटीबद्दल उत्साही असल्याचं म्हटलं आहे. नव्या वर्षाची अशी सुरूवात करणं हा आनंददायी अनुभव असेल. यामध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये संबंध अधिक दृढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वाचं पाऊस असेल असे त्यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

दरम्यान आज दिल्लीमध्ये ब्रिटनचे विदेश सचिव डोमिनिक रॉब आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी 5 विविध थीम वर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये लोकांचा एकमेकांशी संबंध वाढवणं, व्यापार आणि समृड्धी, रक्षा आणि सुरक्षा, जलवायू परिवर्तन आणि आरोग्य यांचा समावेश होता. उच्च शिक्षणासाठी ब्रिटेन येथे जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ.

युके फॉरेन सेक्रेटरी यांनी प्रतिक्रिया देताना आम्हांला भारतासोबत आर्थिक देवाणघेवाण अधिक दृढ करायची आहे. एकमेकांसोबत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दृढ संबंध जपण्याचा मानस आहे. यामुळे आम्हांला एकमेकांच्या मदतीने दहशतवाद, piracy in Western Indian ocean हे विषय अधिक चांगल्याप्रकारे हाताळता येऊ शकतात.