Biological E लस 90% प्रभावी असल्याचा दावा, कोरोना विरुद्धच्या लढ्यात ठरणार 'गेमचेंजर'
Vaccine | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

देशी बनावटीची Biological E लस कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईत 90% प्रभावी ठरु शकरते असा दावा केला जात आहे. तसेच, कोरोना व्हायरस महामारी विरुद्धच्या लढ्यात ही लस कलाटणी देणारी ठरु शकते, असेही बोलले जात आहे. देशातील प्रसिद्ध आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका सल्लागार समितीने ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या कोविड वर्किंग ग्रुपचे चेअरमन एन के अरोरा यांनी म्हटले आहे की, ही लस ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. तसेच, सर्व चाचण्या पूर्ण करुन ऑक्टोबर महिन्यापर्यंत उपलब्ध होऊ शकेल. डॉ. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार Biological E लसीला Corbevax नावाने ओळखले जाईल. ही लस Novavax प्रमाणे असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Novavax कोविड व्हेरीएंटविरुद्ध 90% पेक्षाही अधिक प्रभावी असेन. Novavax ची निर्मिती देशात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) द्वारा केली जात आहे. ही कंपनी ऑक्‍सफोर्ड-एस्‍ट्राजेनेका ची लस निर्मिती करत आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. अरोरा यांनी म्हटले आहे की, Novavax ही अत्यंत प्रभावी आहे. जी सीरम इन्स्टीट्यूटद्वारा निर्मिती केली जात आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये ही बाब समोर आली आहे की, भरतात एक वर्षात सुमारे एक अब्ज डॉस उत्पादीत केले जात आहेत. Novavax चे हे उत्पादन अत्यंत रास्त भआवात असेल आणि त्याची प्रभावक्षमता 90%च्या आसपास असेल. यालाच साधर्म्य असणारी Biological E लसही चाचणीच्या 3 टप्पयात आहे. ही लस प्रत्येक वयोगटातील नागरिकासाठी उपयोगी आहे. तसेच तिचा प्रभावही चांगला आहे. प्रामुख्याने Biological E सर्वात प्रभावशाली ठरु शकते. या लसीच्या दोन डोससाठी 250 रुपयांची किंमत ठेऊन विक्री केली जाऊ शकते. एनडीटीव्ही इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, COVAXIN कोविड प्रतिबंधक लशीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश वापरला असल्याच्या वायरल वृत्तावर केंद्र सरकार कडून स्पष्टीकरण)

डॉ. अरोरा यांनी पुढे म्हटले आहे की, 'Novavax च्या मिळत्या जुळत्या क्षमतेसोबतच Bio E आणखी दोन-तीन महिन्यांनी म्हणजेच साधारण ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध केली जाईल. डॉ. एन के अरोरा हे नॅशनल टेक्निकल अॅडवाइजरी ग्रुप ऑन ईम्‍युनाइजेशन (NTAGI) चे चेअरमनही आहेत. हा ग्रुप कोरोना व्हायरस महामारी संदर्भात देशाला सल्ला देण्याचे काम करतो.