
सापांचा मसीहा (Snakes Messiah) अशी ओळख असलेले बिहार येथील सर्पमित्र जय कुमार सहनी (Jai Kumar Sahni) यांचा सर्पदंशाने (Snake Bite) मृत्यू झाला आहे. सापांना पकडताना, वाचवताना आणि त्यांच्याशी खेळताना त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, ज्या सापांसोबत त्यांची मैत्री असे त्यामुळेच त्यांचे निधन होईल, असे कोणासही वाटले नव्हते. मात्र, असे घडले आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील हरपूर भिंडी वार्ड क्रमांक-3 येथे राहणाऱ्या सहनी यांच्या आंगठ्यास विषारी साप (Venomous Snake) चावला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले.
सर्पमित्र अशीच ओळख
जय कुमार सहनी पाठिमागील पाच वर्षांपाहूनही अधिक काळ सर्पमित्र म्हणून ओळखले जात असत. आजवर त्यांनी अनेक विषारी साप पकडून त्यांचे नैसग्रिक अधिवास असणाऱ्या जंगलांमध्ये सोडले आहे. त्यांना लहानपणापासूनच वन्यजीव, पशू आणि पक्षांबाबत प्रेम होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्राणी, पक्षी अथवा जीव संकटात असेल तर ते त्यांच्या मदतीसाठी धावत. खास करुन सापांशी त्यांचे एक वेगळेच नाते होते. ज्यामुळे अल्पावधीतच ते सर्पमित्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये सापांशी खेळताना दिसतात. त्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा, Demansia cyanochasma: ऑस्ट्रेलियात सापडली विषारी सापाची नवी प्रजाती, नाव घ्या जाणून)
अंगठ्यास सर्पदंश
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सर्पमित्र जय कुमार सहनी यांना गुरुवारी त्यांच्या नजिकच्या गावातून एक फोन आला. ज्यामध्ये एक विषारी साप घरात आढळून आल्याची माहिती मिळाली. ते तातडीने साप पकडण्यास गेले. त्यांनी सापास पकडण्याचा प्रयत्न केला पण, त्यांचा अंदाज चुकला, त्यातच त्यांच्या आंगठ्यास सर्पदंश झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोवर उशीर झाला होता. रुग्णालयातील डॉक्टर संतोष कुमार यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. (हेही वाचा, Man Bites Snake to Death: माणूस चावल्याने सापाचा मृत्यू, बिहारमधील नवादा येथील घटना)
जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी तब्बल 50 लाख लोकांना सर्पदंश होतो. त्यातील 2.7 लाख साप अतिशय विषारी असतात. एका अहवालानुसार, प्रत्येक वर्षी 81 हजार 38 लाख नागरिकांचा मृत्यू सर्पदंशाने होतो.
सर्पमित्रास सर्पदंश
बिहार में 'सांपों के मसीहा' कहे जाने वाले जय कुमार सहनी की जहरीले सांप के डसने से मौत हो गई, बता दें कि अबतक तक जय कुमार 2000 से ज्यादा सांपों की जान बचा चुके थे#Bihar #Samastipur #SnakeMan #TV9Card pic.twitter.com/Aw8SpIPcqy
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) May 3, 2025
एखाद्याला जर साप चावला असेल तर शांत राहा आणि तात्काळ आपत्कालीन सेवांना कॉल करा, विशेषतः जर साप विषारी असेल तर. मदतीची वाट पाहत असताना, त्या व्यक्तीला सापापासून दूर हलवा. विषाचा प्रसार कमी करण्यासाठी शक्य तितके स्थिर ठेवा. चाव्याची जागा हृदयाच्या पातळीच्या खाली ठेवा, चाव्याच्या जवळील कोणतेही दागिने किंवा घट्ट कपडे काढा आणि त्यावर सैल, निर्जंतुकीकरण पट्टी बांधा. विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका, जखम कापू नका, बर्फ लावू नका किंवा टॉर्निकेट वापरू नका, कारण यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. व्यक्तीला अल्कोहोल, कॅफिन किंवा कोणतीही औषधे देणे टाळा. शक्य असल्यास, वैद्यकीय व्यावसायिकांना योग्य उपचार निश्चित करण्यात मदत करण्यासाठी सापाचे स्वरूप लक्षात घ्या, ज्यामध्ये अँटीवेनमचा समावेश असू शकतो.