बिहार (Bihar) राज्यातील खगडिया (Khagadia) जिल्ह्यात एक विचित्र प्रकार पुढे आला आहे. बिहार ग्रामीण बँक, शाखा मानसी (Bihar Gramin Bank Mansi Branch) येथील एका खातेदाराच्या नावावर एका ग्राहकाकडून चुकून 5.5 लाख रुपये पाठवले गेले. घडलेली चूक निदर्शनास येताच बँक (Bihar Gramin Bank) प्रशासनाने तातडीने या खातेदाराशी संपर्क केला आणि हे पैसे परत करण्याविषयी सांगितले. धक्कादाय असे की हे पैसे परत करण्यास संबंधित खातेदाराने चक्क नकार दिला. नकाराचे कारण ऐकून तर बँक प्रशासनास आणखीच धक्का बसला. खातेदाराने सांगितले की, माझ्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच 5.5 लाख रुपये जमा केले आहेत. त्यामुळे हे पैसे आपण परत करु शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. त्यामुळे त्याचेच हे पैसे असावेत. आणखी धक्कादायक म्हणजे खातेदाराने खात्यावर आलेले पैसे काढून ते खर्चही केले. त्यामुळे संबंधीत खातेदारावर आता कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
नेमके काय घडले?
बँकेककडून नजरचुकीने रंजीत दास नामक खातेदाराच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठवले गेले. बँकेला जेव्हा आपली चूक लक्षात आली तेव्हा खातेदाराशी संपर्क करुन त्याला खात्यावर पाठवलेले साडेपाच लाख रुपये परत पाठविण्यास सांगण्यात आले. त्याने हे पैसे परत करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर तर आपण हे पैसे खर्च केले आहेत. कारण हे पैसे आपणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वसनांची पूर्तता होती. त्यांनीच हे पैसे मला पाठवले असा दावा या खातेदारकाने केला. खातेधारकाचे बोलणे ऐकून बँक प्रशासन चांगलेच थक्क झाले. (हेही वाचा, Congress Targets BJP: 'CM नहीं PM बदलो' मुख्यमंत्री बदलण्याने पंतप्रधानांचे अपयश झाकणार नाही; काँग्रेसची ट्विटरवर भाजप विरोधात मोहीम)
ट्विट
Greetings on #EngineersDay to all hardworking engineers. No words are enough to thank them for their pivotal role in making our planet better and technologically advanced. I pay homage to the remarkable Shri M. Visvesvaraya on his birth anniversary and recall his accomplishments.
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2021
बँक प्रशासनाने अनेकदा नोटीस पाठवूनही खातेधारकाने दाद दिली नाही. तेव्हा मानसी पोलिसांनी रंजीत दास याला अटक केली. तो मूळचा बख्तियारपुर गावचा राहणारा आहे. मानसी पोसीस स्टेशनचे इनचार्ज दीपक कुमार यांनी सांगितले की, ग्रामीण बँकेकडून दाखल तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला असून आरोपी रंजीत दास याला अटक करण्यात आली आहे.