Congress Targets BJP: 'CM नहीं PM बदलो' मुख्यमंत्री बदलण्याने पंतप्रधानांचे अपयश झाकणार नाही; काँग्रेसची ट्विटरवर भाजप विरोधात मोहीम
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

भाजप (BJP) नेतृत्वाने पाठीमागील काही महिन्यांमध्ये सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलाचा सपाटाच लावला आहे. उत्तराखंड, कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री बदलल्यानंतर भाजपने आता गुजरात (Gujarat) राज्यात मुख्यमंत्री बदलला. मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची निवड केली. या निवडीवरुन काँग्रेसने (Congress) भाजप आणि भाजप नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या मुख्यमंत्री बदलाबाबत काँग्रेसने ट्विटरवर '#CM_नहीं_PM_बदलो' ही मोहीम सुरु केली आहे. तसेच, आता पंतप्रधानच बदलायला हवा मुख्यमंत्री बदलून पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नसल्याचेही, काँग्रसने म्हटले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे. या निवडणुकीला अवघे एकच वर्ष बाकी राहिले असताना भाजपने गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलला आहे. भाजपने दीर्घकाळ पाटीदार नेता राहिलेल्या भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. यावरुन काँग्रेसने भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान पदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांचे अपयश आधोरेखीत करत ट्विटरवर मोहीम सुरु केली आहे. (हेही वाचा, Political Journey Of Bhupendra Patel: भूपेंद्र पटेल आमदार म्हणून आले आणि पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले, जाणून घ्या असे कसे घडले?)

ट्विट

काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण वेगाने करुन कोरोनावर मात करायला हवी होती. परंतू, ही साधी बाब पंतप्रधान आणि सत्तेतील भाजप सरकारला कळली नाही. देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी पंतप्रधान कधी घेणार आहेत. लसीकरण झालेल्या देशांच्या तुलनेत भारत प्रचंड मागे आहे. आकडेवारीच हे सांगत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

ट्विट

ट्विट

दरम्यान, भूपेंद्र पटेल हे गुजरातराज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भाजप कोणाचा चेहरा पुढे करणार याबाबत उत्सुकता होती. अनेक नावे चर्चेत होती. मात्र, चर्चित चेहऱ्यांना बाजूला ठेवत भाजप नेतृत्वाने धक्कादायकरित्या भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. भूपेंद्र पटेल हे माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.