Political Journey Of Bhupendra Patel: भूपेंद्र पटेल आमदार म्हणून आले आणि पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले, जाणून घ्या असे कसे घडले?
Bhupendra Patel | (Photo Credits: Twitter)

आमदार भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या नावाची गुजरातचे नवे मुख्यमंत्री (New Chief Minister of Gujarat) म्हणून घोषणा झाली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आलेल्या पटेल यांच्या गळ्यात थेट मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. मुख्यमंत्री असलेल्या विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी पदाचा राजीनामा दिल्याने गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत अनेकांना उत्सुकता होती. भाजपच्या गोटातून मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, नितिन पटेल यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या नवाचीही चर्चा होती. मात्र, भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करुन भाजप नेतृत्वाने पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे विजय रुपाणी यांच्या जागेवर भूपेंद्र पटेल यांनी थेट मजल ( Political Journey Of Bhupendra Patel) कशी मारली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली. भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद येथील घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. पक्ष संघटनेवर त्यांची चांगली पकड आहे. या आधीची निवडणूक ते 1.17 लाख मतांनी जिंकले आहेत. त्यांच्या मतदारसंघात ते एक लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आनंदीबेन पटेल यांनी जेव्हा पदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.

भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंत माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्याला अनुमोदन दिले. भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी चे अध्यक्ष राहिले आहेत. याशिवाय ते AMC च्या स्थायी समितीचे अध्यक्षही होते. 2010 ते 2015 या काळात त्यांनी हे पद भूषवले. महत्त्वाचे म्हणजे या काळात ते राजकारणापासून दूर होते. ते पाटीदार समाजाचे नेते म्हणूनही ओळखले जाता. त्यांनी 'Sardardham Vishwa Patidar Kendra' सोबत आपले संबंध दृढ ठेवले आहेत. (हेही वाचा, Bhupendra Patel: भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजप आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब)

भूपेंद्र पेटेल हे ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडले गेले आहेत तो मतदारसंघ माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा म्हणून ओळखला जातो. आनंदीबेन यांच्या नंतर भूपेंद्र पटेल यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयई सुद्धा झाले. अहमदाबाद येथील शिलाज येथील रहवासी असलेले भूपेंद्र पटेल हे 59 वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. त्यांनी इंजियनिरींगचे शिक्षण घेतले आहे. तसेच, त्यांनी सिव्हील इंजीनियरींग डिप्लोमाही केला आहे.