Bhupendra Patel | (Photo Credits: Facebook)

भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे गुजरात (Gujarat) राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. विजय रुपाणी ( Vijay Rupani) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून भाजप कोणाचा चेहरा पुढे करणार याबाबत उत्सुकता होती. अनेक नावे चर्चेत होती. मात्र, चर्चित चेहऱ्यांना बाजूला ठेवत भाजप ( BJP) नेतृत्वाने धक्कादायकरित्या भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel, New Chief Minister of Gujarat) यांच्या नावाची घोषणा केली आहे. भूपेंद्र पटेल हे माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आनंदीबेन पटेल यांनी जेव्हा पदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. गुजरात मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला आणि आर.सी. फालदू यांची नावे जोरदार चर्चेत होती.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भाजप विधमंडळ आमदारांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. ज्यावर सर्वानुमते मोहोर लावण्यात आली. आमदारांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ यांना पक्षनिरिक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. पुढच्याच वर्षी गुजरातमध्ये निवडणुका पार पडत आहेत. तत्पूर्वी भाजपने ही खांदेपालट केली आहे. (हेही वाचा, Next Gujarat CM: विजय रूपाणी यांच्या नंतर कोण असतील गुजरातचे नवे मुख्यमंत्री? आज होणार निर्णय)

ट्विट

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुजरातच्या मंत्रिमंडळातही बरेच फेरबदल केले जातील. अनेक विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाईल. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना घेतले जाईल. तर काही ज्येष्ठ मंत्र्यांची खादी बदलली जातील असे संकेत आहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेले वृत्त असे की, गुजरातमध्ये आरएसएसने एक सर्व्हे केला होता. या सर्वेमध्ये विजय रुपाणी यांचा चेहरा पुढे करुन गुजारत विधानसभा निवडणूक लढल्यास भाजपला पुन्हा सत्ता मिळवणे मोठे आव्हानात्मक ठरु शकते. त्यामुळे आताच काही महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक असल्याचे पुढे आले होते. दरम्यान, काँग्रेस नेते हार्दीक पटेल यांनी दावाक केला आहे की, भाजप आणि आरएसएसने ऑगस्ट महिन्यातच एक गुप्त सर्व्हे केला होता.