Next Gujarat CM: विजय रूपाणी यांच्या नंतर कोण असतील गुजरातचे नवे मुख्यमंत्री? आज होणार निर्णय
File image of Gujarat CM Vijay Rupani | (Photo Credits: PTI)

गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Elections) एक वर्षावर असताना राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी शनिवारी (11 सप्टेंबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने गुजरातच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे मी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार? याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजप आज विधिमंडळ पक्षाची बैठक घेणार आहे.

गुजराच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री मनसुख भाई मांडविया, गुजरात प्रदेश भाजपाध्यक्ष सीआर पाटील, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि लक्षद्वीप लेफ्टनंट राज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या पदासाठी मनसुख मांडविया यांची निवड होण्याची अधिक शक्यता आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh Assembly Elections 2022: शिवसेनेची मोठी घोषणा! उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील सर्व जागा लढण्याचा घेतला निर्णय

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रूपाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला व5र्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे, असे विजय रूपाणी यांनी म्हटले आहे. तसेच "जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे. यानंतर मला जी जबाबदारी मिळेल, ती मी पार पाडेल, असेही त्यांनी म्हटले आहे.