Shivsena (Photo Credits: PTI)

देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे (Uttar Pradesh Assembly Elections 2022) सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेनेने (Shiv Sena) उत्तर प्रदेशमधील सर्व जागा 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा मोठा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र, भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपवर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. "योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात महिला अधिकाधिक असुरक्षित झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे योगी सरकार ब्राह्मणांना योग्य न्याय देत नाही. भाजपच्या राजवटीत यूपीमधील आरोग्य सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेची स्थिती ढासळली असल्याचा आरोपही शिवसेनेने केला. लोक बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त आहेत," असे उत्तर प्रदेशचे शिवसेना पक्षप्रमुख अनिल सिंह यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणावरून अतुल भातखळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

एएनआयचे ट्वीट- 

वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या अंदाजानुसार, भाजपला 250 ते 270 जागा मिळू शकतील. तर, समाजवादी पक्षाला 100 ते 120 जागा विजय मिळवण्याची शक्यता आहे. मायावतींच्या बसपाबाबतचे सर्वेक्षण बघितले तर त्यांना 10 ते 20 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीला थोडेच दिवस उरले असून भाजप यावेळी कोणती रणनीती आखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण यूपीची निवडणूक ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे मीटर मानले जात आहे.