Chirag Paswan: चिराग पासवान यांनी तहात कमावले, लढाईत गमावले? 'किंगमेकर' हा केवळ कल्पनेचा मनोरा? Bihar Assembly Election Result 2020 प्राथमिक कल काय सांगतोय पाहा
Chirag Paswan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Bihar Assembly Election Result 2020) आज (10 नोव्हेंबर) सुरु झाली.अद्याप कोणत्याही जागेवरचा निकाल हाती आला नाही. प्राथमिक अंदाज मात्र जरुर पुढे आले आहेत. हे अंदाज पाहून तेजस्वी यादव यांच्याप्रमाणे चर्चेत असलले चिराग पासवान (Chirag Paswan) यांची कामगरी कशी आहे? लोक जनशक्ती पार्टी (Lok Janshakti Party) किती जागांवर आघाडी घेत आहे, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. काहींनी चिराग पासवान बिहारमध्ये 'किंगमेकर' (Kingmaker) ठरणार का? अशी प्रश्नार्थक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. परंतू, प्राथमिक अंदाजात तरी चिराग पासवान 'किंगमेकर' ठरण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. उलट चिराग यांनी तहात कमावले, लढाईत गमावले असेच चित्र आहे.

सध्यास्थितीत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची कामगिरी पाहता हा पक्ष 5 ते 8 इतक्या जागांपूढे आघाडी घेऊ शकला नाही. काही वेळा तर केवळ 1 ते 2 जागांवरच हा पक्ष आघाडी घेताना दिसला आहे. त्यामुळे केंद्रामध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेला हा पक्ष बिहारमध्ये एनडीएबाहेर जाऊन लढताना (?) दिसतोय खरा. पण त्यात फारसे तथ्य दिसत नाही. कारण, या पक्षाची कामगिरी अद्याप तरी नेत्रदीपक म्हणता येईल अशी दिसत नाही.

चिराग पासवान यांनी आगोदरच स्पष्ट केले होते की, अपवाद वगळता त्यांचा पक्ष भाजपच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार नाही. त्या उलट नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाविरोधात मात्र आपण उमेदवार उतरवणार आहोत. याचा परिणामही दिसून येतो आहे. 2015 मध्ये अधिक जागा असलेला संयुक्त जनता दल आपल्या जागा गमावताना दिसत आहेत. तर संयुक्त जतना दलाचाच मित्रपक्ष असलेला भाजप अधिक जागांवर आघाडी घेताना दिसतो आहे. (हेही वाचा, Bihar Election Results 2020: बिहार मध्ये चिराग पासवान ठरणार का किंगमेकर? कलांमधील UPA-NDA च्या कांटे की टक्कर मध्ये LJP बजावू शकते महत्त्वाची भूमिका)

जदयु आणि भाजप यांची कामगिरी पाहता एनडीए जरी संयुक्त आघाडी घेत असले तरी एलजेपी (लोकजनशक्ती पार्टी) मात्र, अत्यंत सुमार कामगिरी करताना दिसत आहे दुसऱ्या बाजूला. एलजेपीला भाजपचे बळ आहे. जदयुच्या जागा घटविण्यासाठी भाजपने एलजेपीला समोर उभे केले आहे या आगोदरच असलेल्या चर्चेला अधिक बळ मिळते आहे. जदयुची कामगिरी पाहता भाजपचा एलजेपीला पाठिंबा असल्याचे आता उघड गुपीत ठरताना दिसत आहे आहे. पडद्यामागे केलेल्या तहात जिंकले परंतू, लढाईत गमावले असेच चित्र सध्यातरी चिराग पासवान यांच्याबाबत दिसत आहे. त्यामुळे चिराग पासवान यांना बिहारचा किंगमेकर म्हणने हे सध्यातरी केवळ एक 'कल्पनेचा मनोरा' असल्याचे चित्र आहे.