Election Commission (Photo Credits-ANI)

Bihar Assembly Election 2020:  बिहार मधील विधानसभा निवडणूकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. येत्या 28 ऑक्टोंबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणूका विधानसभेच्या 243 जागांसाठी होणार असून त्याचे निकाल 10 नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत. कोरोनाच्या काळात पहिल्यांदाच होणाऱ्या या विधानसभा निवडणूका कशा असणार, रॅली होणार का? असे प्रत्येक प्रश्न आता प्रत्येकाला पडले आहेत. अशातच आता मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा (Sunil Arora) यांनी असे म्हटले आहे की, मोठ्या रॅलीला परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा असणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रॅलीसाठी जिल्ह्यातील मैदानांची लिस्ट तयार केली आहे. या मैदानांना निवडणूक आयोगाचे अधिकारी भेट देऊन गेले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी शुक्रवारी निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर एका प्रश्नावर उत्तर देताना असे म्हटले की, मोठ्या निवडणूकीच्या रॅलीसाठी परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन करणार आहे. तसेच रॅलीच्या आयोजनासाठी काही मैदानांची सुद्धा निवड करण्यात आले आहे.(Bihar Assembly Elections 2020 Dates: बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित, तिन टप्प्यात मतदान; 10 नोव्हेंबरला मतमोजणी)

बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोंबरला मतदान होणार, दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मदतान होणार आहे. सर्व 243 जागांचे निकाल 10 नोव्हेंबरला घोषित होणार आहे. 1 ऑक्टोंबर पासून पहिल्या टप्प्यातील नाव नोंदणीसाठी सुरुवात होणार आहे.

रॅलीमध्ये किती लोक असणार?

निवडणूक आयोगाकडून रॅली आणि जनसभेसाठी विस्तृत दिशा-निर्देशन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुसार राज्यातील आपत्ती व्यवस्थापन अथॉरिटी यांच्याकडून ठरवून दिलेल्या लोकांपेक्षा अधिक लोक राजकीय रॅलींमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. निवडणूक आयोगाने जिल्हा निर्वाचिन अधिकारी आणि पोलीस अधिक्षकांची जबाबदारी ठरवत असे म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यातील रॅलींसाठी असे मैदान निवडायचे आहे जेथे एन्ट्री आणि एक्झिटची योग्य सुविधा असणार आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन अथॉरिटीने जेवढ्या जणांचा मैदानात उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे तेवढेच जण तेथे असणार आहेत. घरोघरी जाऊन कॅम्पेन करण्यासाठी उमेदवार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसगह फक्त पाच लोकांना परवानगी दिली जाणार आहे. मतदान केंद्रावर प्रत्येक व्यक्तिला मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. तसेच गेटवर थर्मल स्कॅनिंग होणार असून सॅनिटायझर आणि पाणी सुद्धा उपलब्ध असणार आहे.