भारत बायोटेक द्वारे विकसित कोविड19 साठी नाकातून दिल्या जाणाऱ्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजूरी देण्यात आली आहे. जैवप्रौद्योगिकी विभाग (डीबीटी) यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. डीबीटीने असे म्हटले आहे की, 18 वर्ष ते 60 वर्षादरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींचे पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाले आहे. त्यांनी असे ही म्हटले की, भारत बायोटेकची नाकाच्या वाटेने दिली जाणारी लस ही पहिलीच नेजल लस असणार आहे. आता याच्या दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला परवानगी मिळाली आहे.
आधी जाहीर करण्यात आलेल्या विधानात डीबीटी यांनी असे म्हटले होते की, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजूरी मिळाली आहे. नियामकची मंजूरी, सार्स- कोव टू लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील यादृच्छिक, बहुकेंद्रित चाचणीला मंजूरी दिली आहे. कारण बीबीवी152(कोवॅक्सिन) ची बीबीवी154 (इंट्रानेजल कोविड19 लस) सह निरोगी सहभागींचे सुरक्षितपणे आणि रोग-प्रतिरोधक मूल्यांकन केले जाऊ शकते.
या प्रकारची ही पहिलीच कोविड19 ची लस आहे ज्याची भारतात मनुष्यावर क्लिनिकल ट्रायल केली जाणार आहे. ही लस बीबीवी 154 असून त्याची प्रौद्योगिकी भारत बायोटेकने सेंट लुईस स्थित वॉग्शिंटन युनिव्हर्सिटी येथून मिळवली होती. डीबीटीने असे म्हटले, कंपनीने माहिती दिली आहे की पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल टप्प्यात सहभागी झालेल्यांना लावण्यात आलेली लस ही शरिरावर प्रभावशाली ठरली आहे. त्यांच्यावर कोणतेही गंभीर प्रभाव जाणवले नाही.
क्लिनिकल पूर्व अभ्यासात सुद्धा लस सुरक्षित असल्याचे समोर आले होते. जनावरांवर करण्यात आलेल्या अभ्यासात लस अँटीबॉडीचा उच्च स्तर तयार करण्यास यशस्वी झाली. कोविड19 लसीच्या विकासासाठी मिशन कोविड सुरक्षेची सुरुवात केली होती.(Sputnik light: जाणून घ्या नेमकी कधी मिळणार रशियन स्पुतनिक लस ? 'या' किंमतीला मिळेल बाजारात)
दरम्यान, देशात तीन लस भारत बायोटेकची कोवॅक्सन, सीरम इंस्टिट्युटची कोविशील्ड आणि रशियाची स्पुटनिक वी सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध आहे. सरकारने मॉडर्नाच्या एमआरएनए लस आणि जॉनसन अॅन्ड जॉनसनच्या सिंगल डोस लसीच्या वापराला सुद्धा परवानगी दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 52.95 कोटी लोकांना डोस दिले आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या मते, गुरुवारी 18-44 वर्षामधील नागरिकांना 27,83,649 लसीचा पहिला डोस आणि 4,85,193 जणांना दुसरा डोस दिला आहे.