After Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांची 'भारत बंद'ची हाक
भारत बंद (फोटो सौजन्य- पीटीआय)

After Pulwama Terror Attack: जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळत आहे. तसेच राज्यातील विविध ठिकाणी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली जात असून कँन्डल मार्च, आंदोलने केली जात आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन शहीद जवानांना श्रद्धांजली दिली जात आहे. याच स्थितीत आता येत्या 18 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांनी भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे.

सीएआयटीने (CAIT) असे म्हटले आहे की, सर्व भारतीय देशवासीय या भ्याड हल्ल्यामुळे संतप्त झाले आहेत. त्यामुळेच येत्या 18 फेब्रुवारी रोजी सर्व व्यापारी देशात बंदची हाक देणार आहोत. या माध्यमातून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासोबत त्यांच्या परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी होणार असल्याचे व्यापारी संघाने म्हटले आहे. त्याचसोबत राजस्थान येथे शुक्रवारी बंदची हाक देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. तर अहमदाबाद, गुजरातचे व्यापारीही एक दिवस बंदची हाक देणार आहेत. (हेही वाचा-Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 42 CRPF जवानांची संपूर्ण लिस्ट)

या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवानांचा मृत्यू झाला. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. देशभर रोष आणि शोकाच वातावरण आहे. आज सीआरपीएफकडून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यासोबतच दहशतवाद्यांना एक खास संदेश देखील देण्यात आला आहे. शहिदांच्या सन्मानार्थ त्यांचा झेंडा देखील अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. तर समाजातील सार्‍या स्तरातून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. पंतप्रधानांनीदेखील हे हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही असं सांगितलं आहे.