Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 42 CRPF जवानांची संपूर्ण लिस्ट
Pulwama Terror Attack list of martyred CRPF jawans (Photo Credits: CRPF India / Twitter)

Pulwama Terror Attack  Martyred CRPF Jawans Name List:  जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारीच्या दुपारी CRPF च्या बसवर हल्ला करून 42 जवानांना ठार केलं. या भ्याड दहशतवादीचा हल्ल्याचा बदला घेतला जाईल असं म्हणत सीआरपीएफने देखील शहीदांना आदरांजली दिली आहे. राजनाथ सिंग यांनी शहीदांना खांदा देत सरकार आणि भारतीय शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे. या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचादेखील समावेश आहे. Pulawama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद नितीन राठोड,संजय राजपूत यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची सरकारी मदत जाहीर

 

पहा पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीरांची नावं -:

-हेड कांस्टेबल (चालक) जयमल सिंह

-हेड कांस्टेबल नसीर अहमद

-कांस्टेबल सुखविंद्र सिंह

-कांस्टेबल रोहताश लांबा

-कांस्टेबल तिलक राज

-कांस्टेबल भागीरथ सिंह

-कांस्टेबल बिरेंद्र सिंह

-हेड कांस्टेबल अवधेश कुमार यादव

-कांस्टेबल नितिन राठोड

-कांस्टेबल रतन कुमार ठाकुर

-कांस्टेबल (चालक) सुरेंद्र यादव

-हेड कांस्टेबल संजय कुमार सिंह

-हेड कांस्टेबल रामवकील

-कांस्टेबल धर्मचंद्रा

-कांस्टेबल बेलकर ठाका

-कांस्टेबल श्याम बाबू

-कांस्टेबल अजीत कुमार आजाद

-कांस्टेबल प्रदीप सिंह

-हेड कांस्टेबल संजय राजपूत

-कांस्टेबल कौशल कुमार रावत

-कांस्टेबल जीत राम

-कांस्टेबल अमित कुमार

-कांस्टेबल ब्याय कुमार मौर्य

-कांस्टेबल कुलविंद्र सिंह

-हेड कांस्टेबल विजय शोरंग

-कांस्टेबल वसंत कुमार वीवी

-कांस्टेबल गुरू एच

-कांस्टेबल शुभम अनिरंग जी

-कांस्टेबल अमर कुमार

-कांस्टेबल अजय कुमार

-कांस्टेबल महिंद्र सिंह

-कांस्टेबल रमेश कुमार

- हेड कांस्टेबल प्रसन्ना कुमार शाऊ

-हेड कांस्टेबल हेम राज मीणा

-हेड कांस्टेबल बबला शांतरा

-कांस्टेबल  अश्विनी  कुमार कोचि

- कांस्टेबल प्रदीप कुमार

-कांस्टेबल सुधीर कुमार बंसल

-कांस्टेबल रविंद्र सिंह

-हेड कांस्टेबल एम बसुमात्रेय

-कांस्टेबल महेश कुमार

-हेड कांस्टेबल एनएल गुर्जर

Pulwama Terror Attack list of martyred CRPF jawans (Photo Credits:Twitter)

केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यासोबत विविध धार्मिक संस्थान, एनजीओ यांच्याकडून शहीदांच्या कुटुंबीयांना मदतीचे हात पुढे आले आहेत. देशभर पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटले आहेत. कलाकार, सेलिब्रिटी सह सामान्य भारतीय नागरिकांनीही शहीदांना आदरांजली अर्पण केली आहे. Pulwama Terror Attack: दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण? सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय असते त्यांची जबाबदारी?

अवंतीपूराहून लष्कराचे जवान जात असताना त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात IED चा वापर करण्यात आला. IED स्फोटानंतर अंदाधूंद  गोळीबार करण्यात आला.