Pulwama Terror Attack: 'आम्ही ना विसरणार, ना माफ  करणार', CRPF ची शहिदांना श्रद्धांजली
CRPF Tweet (Photo Credits: Twitter)

CRPF Tweet On Pulwama Terror Attack: जम्मू काश्मिर येथील पूलवामा (Pulwama)  जवळ 14 फेब्रुवारीच्या दुपारी कुटुंबीयांना भेटून परतणार्‍या CRPF च्या जवानांची बस उडवण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवानांचा मृत्यू झाला. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. देशभर रोष आणि  शोकाच  वातावरण आहे.  आज सीआरपीएफकडून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यासोबतच  दहशतवाद्यांना एक खास संदेश देखील देण्यात आला आहे.  शहिदांच्या सन्मानार्थ  त्यांचा झेंडा देखील अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.  Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांमध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला आता उत्तर दिलं जाईल. आणि त्याचा योग्य बदला घेतला जाईल असं म्हणताना सीआरपीफच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर 'ना विसरणार ना माफ' करणार. आम्ही शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो, शहिदांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही देखील आहोत. असं सांगताना या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असं ट्विट करण्यात आलं आहे. Pulwama Terror Attack: दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण? सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय असते त्यांची जबाबदारी?

समाजातील सार्‍या स्तरातून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. पंतप्रधानांनीदेखील हे हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही असं सांगितलं आहे. सध्या जम्मू काश्मिरमध्ये इंटरनेटसेवा स्थगित करण्यात आली आहे. जम्मूमध्ये कर्फ्यु लावण्यात आला आहे. मुंबईसह देशातील महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.