Pulwama Terror Attack:  पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांमध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश
Visual from Pulwama attack site (Photo Credits: IANS)

Pulwama Terror Attack  Martyrs List:  व्हेलेंटाईन  डे  हा 'प्रेमाचा' दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र जगभरात 14 फेब्रुवारीला प्रेम आणि आनंदाचं सेलिब्रेशन सुरू असताना दुपारी अचानक पुलवामा (Pulwama) येथे CRPF च्या जवानांवर भ्याड हल्ला करून 40 जणांना ठार करण्यात आले. कुटुंबाला भेटून परतणार्‍या CRPF च्या जवानांच्या ताफ्यातील एक बसवर हल्ला करण्यात आला होता. या हल्लामध्ये संजय राजपूत (Sanjay Rajput) आणि नितीन राठोड (Nitin Rathod) या महाराष्ट्राच्या दोन जवानांचा समावेश होता. Pulwama Terrorist Attack: दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद; पंतप्रधान म्हणाले 'जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही'

संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर गावामधील आहेत. तर नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यात राहत होते. या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर देशभरात शोकाची आणि संतापाची लाट पसरली आहे. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

सध्या जम्मू काश्मिरमध्ये इंटरनेटसेवा स्थगित करण्यात आली आहे. देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील या हल्ल्याची निंदा करण्यात आली आहे. भारताकडून या जवानांचं हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही सांगण्यात आले आहे.