Maharashtra Government help for Pulwama Martyrs

Pulwama Terror Attack: जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने CRPF च्या बसवर हल्ला करून 40 जवानांना ठार केलं. आज जम्मू काश्मिरमध्ये शोकाकूल वातावरणात सीआरपीएफ जवानांनी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शहिदांना मानवंदना दिली. उरी नंतर सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या भारतीय जवानांवरील या हल्ल्याचा देशभर निषेध केला जात आहे. या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचादेखील समावेश आहे. या दोन शहीदांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली आहे. Pulwama Terror Attack: 'भारत के वीर' या अॅप किंवा वेबसाईटवरुन शहीदांच्या कुटुंबियांना अशी करा आर्थिक मदत

महाराष्ट्र सरकारची मदत

महाराष्ट्र सरकारने पुलवामा येथील हल्ल्यात दोन शहिदांच्या कुटूंबियांना 50 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. सांगलीमध्ये सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीची घोषणा केली आहे. संजय राजपूत आणि नितीन राठोड या दोघांचा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर गावामधील आहेत. तर नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यात राहत होते.  Pulwama Terror Attack: दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण? सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय असते त्यांची जबाबदारी?

देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली 

महाराष्ट्र सरकारकडून शहीदांना आज मंत्रालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. दोन मिनिटं शांतता पाळून कामकाजाची सुरूवात झाली.