Bharat Bandh | Representational Image (Photo Credits: PTI)

उद्या, म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशात ‘भारत बंद’ची (Bharat Bandh) घोषणा करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान उद्या ‘भारत बंद’ असेल. 26 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या भारत बंदमध्ये देशभरातून 8 कोटी व्यापारी सहभागी होणार आहेत. यासह ट्रान्सपोर्टर्स ऑर्गनायझेशननेही या दिवशी 'चक्का जाम' जाहीर केला आहे. यावेळी देशभरात सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत वाहतुकीची कोंडी होईल. जीएसटी व्यवस्था सुलभ करण्याच्या उद्देशाने व्यापाराची सर्वोच्च संस्था, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

यासह रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था अखिल भारतीय ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने (AITWA) कॅटच्या समर्थनार्थ या दिवशी 'चक्का जाम' जाहीर केला आहे. यामुळे 26 फेब्रुवारी रोजी सर्व व्यापारी बाजार बंद राहतील. कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जीएसटी कौन्सिलकडून वस्तू व सेवा करच्या कडक तरतुदी रद्द कराव्यात या मागणीसाठी, 26 फेब्रुवारी रोजी देशभरात 1500 ठिकाणी धरणे आंदोलनही होईल.

दुसरीकडे, सर्व राज्यस्तरीय परिवहन संघटनांनी भारत सरकारने सुरू केलेल्या नवीन ई-वे बिल कायद्यांविरूद्ध कॅटला पाठिंबा दर्शविला आहे. या काळात परिवहन कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग, वितरण, लोडिंग/अनलोडिंग होणार नाही. सर्व परिवहन कंपन्यांना निषेधासाठी सकाळी 6 ते रात्री 8 या दरम्यान वाहने आहे तशीच पार्क करण्यास सांगितले गेले आहे. (हेही वाचा: New Guidelines for Social Media, OTT Platform: सोशल मीडिया , ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी लवकरच नवी नियमावली- केंद्र सरकार)

देशाच्या परिवहन क्षेत्राव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने इतर राष्ट्रीय व्यापार संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये विशेषत: फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एफएमसीझेड वितरक, फेडरेशन ऑफ अ‍ॅल्युमिनियम भांडी उत्पादक आणि व्यापारी संघटना, उत्तर भारत मसाले व्यापारी संघटना, अखिल भारतीय महिला उद्योजक संघटना, अखिल भारतीय संगणक विक्रेते संघटना, अखिल भारतीय कॉस्मेटिक उत्पादक संघटना इ. चा समावेश आहे. दरम्यान, उद्याच्या बंदच्या आधी व्यापारांनी त्यांची समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे संपर्क साधला होता. रविवारी व्यापारांनी त्यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्यांची जाणीव करून दिली होती.