Drink करण्यासाठी पैसे दिले नाही, आईवर पेट्रोल टाकून जाळले
आरोपी उत्तम कुमार (फोटो सौजन्य-ANI)

बंगळरु येथे एका तरुणाने आईने दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून चक्क मुलाने तिच्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच पोलिसांकडून आरोपीचा शोध घेत असल्याचे सांगितले आहे.

उत्तम कुमार(20) असे या तरुणाचे नाव आहे. सदाशिवनगर येथे राहणाऱ्या उत्तमने आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र आईने पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यावरुन दोघांमध्ये पैशांवरुन भांडण झाले. त्यावेळी उत्तमने रागाच्या भरात आईवर पेट्रोल टाकून जाळले.

या घटनेमध्ये उत्तमची आई गंभीर जखमी झाली आहे. तर तिच्यावर रुग्णालयात उपाचार चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.