Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या Barge P305 चा शोध अखेर लागला; मृतांचा आकडा 66 वर
Barge P305 (Photo Credits: ANI)

तौक्ते चक्रीवादळात (Cyclone Tauktae) समुद्रात बुडालेल्या Barge P305 चा शोध अखेर लागला आहे. अरबी समुद्रात 30 मीटर अंतरावर बार्ज P305 सापडले असून त्यासाठी नौदलाच्या INS मकर या युद्धनौकेची मदत घेण्यात आली. शनिवारी सकाळी  INS Makar आणि  INS Tarasa या युद्धनौकांनी मुंबईच्या समुद्रात सुमारे 175 किमी अंतरावर शोधमोहिम सुरु केली. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 66 वर पोहचला आहे. तरी देखील अद्याप 10 लोक बेपत्ता आहेत. एकूण 188 लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

गेल्या रविवारी तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव वाढू लागला. त्यावेळी बार्ज P305 वादळाच्या तडाख्यात सापडला, त्याचे तीनही नांगर तुटले आणि जवळील मुंबई हाय तेलउत्खनंन प्रकल्पाच्या खांबाला धडकले. त्यामुळे बार्ज बुडू लागला. त्यावेळी बार्जवर एकूण 261 लोक होते. काहींनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. मात्र उसळलेल्या समुद्रात ते दूरवर वाहून गेले. वादळ क्षमल्यानंतर नौदलच्या मदतीने मदतकार्यला सुरुवात झाली. (Cyclone Tauktae: P-305 बार्जवरील मृत कर्मचाऱ्यांची ओळख पटवणे झाले कठीण; मुंबई पोलिसांनी मागवले 40 DNA सँपिलिंग किट)

दरम्यान, हे बार्ज बुडाल्याप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्रीवादळाची सूचना मिळूनही बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातल्याने त्यांच्याविरोधात  कलम 304 (2), कलम 338 आणि कलम 334 अन्वये सदोष मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तज्ञ आणि विशेष साधनांच्या मदतीने ही शोधमोहिम करण्यात आली. INS Makar हे मकर-वर्गाचे एक आघाडीचे जहाज आहे. आयएनएस मकर नेचरल चार्ट तयार करण्यासाठी नौदलाकडून हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करण्यासाठी आणि समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण करून सागरी पर्यावरणीय माहिती गोळा करण्यास सक्षम आहे. INS Tarasa हे Nicobar-class मधील जहाज आहे.