उत्तर प्रदेशातील अयोध्येतील (Ayodhya) रामजन्मभूमी संकुलात भव्य राम मंदिराचे (Ram Temple) बांधकाम वेगाने सुरू असून ते डिसेंबर 2023 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच जानेवारी 2024 पर्यंत (मकर संक्रांती) मंदिरात रामलल्ला विराजमान होण्याची आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज वर्तवला जात आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ही माहिती दिली आहे.
राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर लाखो भाविक अयोध्येला पोहोचतील, त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. अयोध्येत प्रवासी आणि पर्यटकांसाठी विमानतळ बांधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय रेल्वे स्थानकही भव्य करण्यात येत आहे. यासोबतच अयोध्येची रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी दुहेरी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर शहरात 6 पार्किंग तयार करण्यात येत असून, तेथे वाहने पार्क केल्यानंतर भाविक इलेक्ट्रिक वाहनानेच अयोध्येत प्रवेश करतील. (हेही वाचा: ज्ञानवापी मशीद प्रकरणात न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली, पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने प्रदीर्घ बैठकीनंतर ट्रस्टच्या नियमावलीला मंजुरी दिली. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, फैजाबाद सर्किट हाऊस येथे झालेल्या या बैठकीत ट्रस्टच्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला की, हिंदू धर्माशी संबंधित महान व्यक्ती आणि संतांच्या पुतळ्यांनाही रामजन्मभूमी संकुलात स्थान दिले जाईल. संपूर्ण मंदिर परिसरात आणखी सात मंदिरे बांधली जाणार असल्याचेही समोर आले आहे.
चंपत राय पुढे म्हणाले की, तज्ज्ञांच्या अहवालाच्या आधारे ट्रस्टने मांडलेल्या अंदाजानुसार राम मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च केले जातील. या बैठकीत ट्रस्टचे 15 पैकी 14 सदस्य सहभागी झाले होते, त्यात बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, गोविंद देव गिरी, खजिनदार गोविंद देव गिरी, उडुपी पीठाधीश्वर विश्व तीर्थ प्रसन्नाचार्य यांचा समावेश होता.