Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धा राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला Sachin Tendulkar ते Mukesh Ambani 7000 खास पाहुण्यांना आमंत्रण!
Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

22 जानेवारी 2024 दिवशी अयोद्धेच्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी आमंत्रणपत्रिका जारी करण्यास सुरूवात झाली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार यामध्ये हजारो निमंत्रितांचा समावेश आहे. क्रिकेट विश्वातील देव सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) सह विराट कोहली (Virat Kohli), उद्योगजगतात मुकेश अंबानी (Mukrsh Ambani), गौतम अदानी, सिने कलाकार, राजकीय मान्यवर, कारसेवकांची कुटुंब, पद्म विजेते आणि परदेशी पाहुणे यांचाही समावेश आहे. रामायण मालिकेतील राम सीता अर्थात अरूण गोविल आणि दिपिका चिखलिया यांचाही त्यामध्ये समावेश आहे. 7000 जणांना आमंत्रण पाठवण्यात आली असून त्यामध्ये 300 0 VIPs चा समावेश आहे. मंदिर निर्माणासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यातील मृत कारसेवकांच्या कुटुंबांना देखील निमंत्रणं दिली जातील.

सरसंघचालक मोहन भागवत, बाबा रामदेव यांच्यासमवेत काही पत्रकारांनाही या मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले जाणार आहे. तसेच 50 देशातून किमान एक प्रतिनिधी देखील आमंत्रित केला जाईल अशी माहिती General secretary of Shri Ram Janmabhoomi Trust, Champat Rai यांनी दिली आहे. BJP MLA Demands Holiday On Opening Day of Ram Mandir: भारत सरकारने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी; भाजप आमदार Raj K Purohit यांची मागणी.

राम मंदिरामधील मूर्ती कशी असेल?

राम लल्लांची मूर्ती ही भगवान श्रीराम वय वर्ष 5 चे असतानाची मूर्ती ठेवली जाणार आहे. यासाठी 3 मूर्त्या बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी कर्नाटक आणि राजस्थान मधून आणलेल्या दगडातून मूर्ती साकारण्याचं काम सुरू आहे. सध्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. सर्वात देखणी मूर्ती अंतिम केली जाईल असेही राय म्हणाले आहेत.

आमंत्रितांना एक लिंक दिली जात आहे. ज्यावर त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. ते रजिस्टर झाल्यानंतर बार कोड दिला जाईल. हा बार कोड त्यांच्यासाठी एंट्री पास असणार आहे.