Floods | (File Photo)

Assam Floods: एका बाजूला कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका आणि दुसऱ्या बाजूला महापूर (Floods) अशा विचित्र कात्रित असम (Assam) राज्य सापडले आहे. आलेल्या महापूरात असम राज्यात आतापर्यंत 97 जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे 26 लाख नागरिकांचे जनजीवन या महापूरामुळे अस्ताव्यस्त झाले आहे. असम राज्य आपत्ती व्यवस्थाापन प्राधिकरण (Disaster Management Authority) द्वारा प्राप्त माहितीनुसार, राज्यातील 33 पैकी 27 जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला आहे.

महापूर आणि भूस्खलन यांमुळे झाललेल्या एकूण मृतांचा आकडा आता 123 वर पोहोचला आहे. एएसडएमएने (ASDMA ) माहिती देताना सांगितले की, महापूरामुळे 97 तर भूस्खलनामुळे 26 नागरिकांच्या आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

महापुरामुळे विविध ठिकाणी रस्ते, पूल आणि इतर अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. राज्यातील वन्यजीवनावरही तीव्र परिणाम झाला आहे. राज्य सरकारने सांगितले की, काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह येथील बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. काही प्राणयाचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 14 गेंडे, 5 जंगली म्हशी, 8 रानडुक्कर, दोन हरीण, 95 hog हरीण, एक असजगर अशा व्यन्य प्राणांचा समावेश आहे.

असममधील गोलपारा हा जिल्हा अधिक पूरग्रस्त आहे. या जिल्ह्याला महापूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यातील सुमारे 4.7 लाख लोक बेघर झाले आहेत. ब्रह्मपुत्र नदी ही अद्याप धोकादाय पातळी ओलांडून वाहात आहे. गुवाहाटी, तेजपूर, धुबरी आणि गोलपारा या शहरांवरील अती धोकादायक क्षेत्र मानले जात आहे.