AN-32 विमान दुर्घटनेत सर्व 13  जणांचा मृत्यू; मृतदेह जोरहाट येथे घेऊन जाण्याचा वायुसेनेचा निर्णय
IAF AN-32 (Photo Credits: IANS)

भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force) बेपत्ता असलेले AN-32 विमानातील सर्व 13 जणांचा मृत्यू झाला आहे आणि हे सर्व मृत्यूदेह जोरहाट येथे नेण्यात येणार आहेत. 3 जून रोजी अरुणाचल प्रदेश येथे या विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी वायुसेनेने शर्थीचे प्रयत्न केले.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तेरा जणांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले. त्याचवेळेस सात मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली. वायुसेनेचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितले की, या अपघाताचे कारणाचे शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व वायूसैनिकांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. तसंच या मृतांच्या कुटुंबियांच्या पाठिशी वायूसेना असल्याचे त्यांनी सांगितले. (भारतीय वायुसेनेच्या बेपत्ता AN-32 Aircraft ची माहिती देणाऱ्याला मिळणार 5 लाखांचे बक्षिस)

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे:

विंग कमांडर जी.एम. चार्ल्स, स्कवाड्रन लीडर एच. विनोद, फ्लाइट लेफ्टिनेंट आर. थापा, ए. तंवर, एस. मोहंती, एम. के. गर्ग, वारेंट ऑफिसर के. के. मिश्रा, सार्जेट अनूप कुमार, कॉरपोरल शेरिन, लीडिंग एयरक्राफ्ट मॅन एस.के. सिंह, पंकज, नॉन कॉम्बेटेंट (इनरोल) पुताली आणि राजेश कुमार.

तब्बल आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर या विमानाचा थांगपत्ता लागला. मंगळवारी (11 जून) रोजी या विमानाचे अवशेष सापडले.