IAF AN-32 Aircraft | Image Used For Representational Purpose | (Photo Credits: PTI)

भारतीय वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या AN-32 विमानाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे वायुसेनेच्या या विमानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 5 लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. डिफेंस पीआरओ विंग कमांडर रत्नाकर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एयर मार्शल आरडी माथुर, AOC इन कमांड, इस्टर्न एअर कमांड  यांनी 5 लाखांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. बेपत्ता AN-32 विमानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या ग्रुपला हे बक्षीस देण्यात येईल. (भारतीय वायू सेनेचं AN-32 Aircraft बेपत्ता, विमानाच्या शोधासाठी इंडियन एअर फोर्सची सुखोई -30, सी - 130 रवाना)

विंग कमांडर रत्नाकर यांनी सांगितले की, बेपत्ता विमानाची माहिती देण्यासाठी 0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकांवर संपर्क साधा. या बेपत्ता विमानाचा शोध वायुसेना घेत आहे. त्याचबरोबर सेना, अरुणाचल प्रदेश सरकार आणि इतर एजेंसीज या विमानाचा शोध घेत आहेत.

ANI ट्विट:

6 दिवसांनंतरही विमानाची काही माहिती हाती लागली नाही:

भारतीय वायुसेनेचे बेपत्ता विमान AN-32 च्या शोध विविध एजेंसीज घेत असून त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. खराब वातावरणातही सहाव्या दिवशी विमानाची शोध मोहीम सुरु होती.

भारतीय हवाई दलाचे हे विमान सोमवारी (3 जून) रोजी बेपत्ता झाले. वैमानिक आशिष तन्वर (29) हे देखील आपल्या पत्नीच्या डोळ्यादेखत गायब झाले. आशिष यांच्या पत्नी संध्या या हवाई दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. वैमानिक आशिष तन्वर सह विमानातील 13 प्रवाशांचाही शोध अद्याप सुरु आहे.