भारतीय वायू सेना (Indian Air Force) विमान ए एन 32 (AN-32 Aircraft) हे गेली तीन तास बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार या विमानात एकूण 13 लोक आहेत. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर या विमानाचा रडार सोबतचा संपर्क तुटला. तेव्हापासून हे विमान बेपत्ता आहे.
प्राप्त माहितीनुसारह, या विमानात वैमानिक पथकाचे 8 सदस्य आणि 5 प्रवासी आहेत. या विमानानं असम येथील जोरहाट येथून उड्डाण घेतलं. या विमानानं दुपारी 12. 25 मिनिटांनी जोरहाट एअरबेस येथून उड्डान घेतले होते.
विमानाने उड्डाण घेतल्यापासून साधारण दुपारी एक वाजलेपासून त्याचा रडारशी संपर्क तुटला. विमानाचा रडारसोबत संपर्क तुटल्याला सुमारे अडीच तास उलटून गेले आहेत. त्यामुळे विमानाचा शोध घेण्यासाठी आईएएफने आपली सुखोई -30 आणि सी - 130 विमानं पाचारण केली आहेत.