Amrita Sher-Gil Paintings: अमृता शेरगिल यांच्या चित्रांचा कलाकारांच्या दुनियेत विश्वविक्रम; 37.8 कोटी रुपयांना विकले गेले पेंटींग

अमृता शेरगिल (Amrita Sher-Gil) यांच्या एका चित्राने विक्रीचा विश्वविक्रम केला आहे. अमृता शेरगील यांचे 1938 मधील 'इन द लेडीज एनक्लोजर' (In the Ladies’ Enclosure) हे पेंटींग मुंबई येथील सैफ्रोनार्ट द्वारा तब्बल 37.8 कोटी रुपये (5.14 मिलियन अमेरिकी डॉलर) इतक्या किमतीला विकले गेले आहे. हा लिलाव मंगळवारी पार पडला. या लिलावात एका कलाकाराने विक्रमी बोली लावून हे चित्र विकत घेतले. लिलावगृहात एकाने सांगितले की, व्ही एस गायतोंडे यांचे शिर्षकहीन-1961 नंतर जागतिक स्तरावर विक्री झालेले हे दुसरे सर्वात महागडी कलाकृती आहे. जे या महिन्याच्या मार्च महिन्यात 39.98 कोटी रुपयांना विकले गेले होते.

अमृता शेरगिल (1913-1941) या एक हंगेरियन-भारतीय चित्रकार होत्या. त्यांनी 20 व्या शतकाच्या सुरुवातीस प्रसिद्ध चित्रकार अवंत-गार्डे (Avant-Garde) म्हणून ओळखले गेले. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे त्यांच्या कलाकृतीचा एक मोठा संग्रहही आहे. सॅफ्रोनार्टचे सीईओ आणि सहसंस्थापक दिनेश वजीरानी यांनी माहिती देताना सांगितले की, अमृता शेर गिल यांची 1938 पासून 'इन द लेडीज एनक्लोजर' शिर्षकाची सेमिनल पेंटींग्जची विक्रमी विक्री ही त्यांच्या अत्युच्च कलाकृतीची ओळख पटवून देते. (हेही वाचा, 2 वर्षांची चित्रकार; लाखो रुपयांना होत आहे चित्रांची विक्री)

वजीराणी यांनी सांगितले की, हे काम एक कलाकार म्हणून त्यांच्या कलाकृतीला पुढे आणते. याशिवाय त्यांच्या चित्राला प्राप्त झालेली किंमत पाहता त्यांनी कलेच्या क्षेत्रात आणखी एक नवे स्थान पादाक्रांत केले आहे. अमृता शेरगिल यांची कलाकृती नेहमीच अनेकांना प्रोत्साहन देत राहील असे वजीराणी यांनी सांगितले.