2 वर्षांची चित्रकार; लाखो रुपयांना होत आहे चित्रांची विक्री
लोला जुन (संग्रहित संपादित प्रतिमा)

अमेरिकेमध्ये सध्या एका पेंटरची चांगलीच चर्चा रंगली आहे. लोला जून (Lola June)असे या पेंटर मुलीचे नाव असून, ती फक्त दोन वर्षांची आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वयात तिने बनवलेली चित्रे ही लाखो रुपयांना विकली गेली आहेत. नुकतेच न्यूयॉर्कच्या आर्ट वर्ल्ड गॅलरीमध्ये तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात लोलाच्या 40 पैकी 38 चित्रांची विक्री झाली. लोलाची ही कला तिच्या आईच्या मैत्रिणीने शोधून काढली, त्यावेळी लोलोने घराच्या भिंतीवर चित्रे काढण्यापासून सुरुवात केली होती. पुढे लोलाच्या पालकांनी याला खत पाणी घालून वाढवले.

न्यूयॉर्क मधील एक प्रसिद्ध डॉक्टर डेव्हिड कॉलबर्ट सांगतात, ते चाशामा आर्ट गॅलरी समोरून जात असताना एका पेंटिंगवर त्याची नजर खिळली आणि ते खरेदी केल्याशिवाय त्यांचे पाउल पुढे पडेना. शेवटी त्यांनी 600 आणि 200 डॉलर्सना दोन पेंटिंग खरेदी केली. त्यावेळी त्यांना हा कलाकार एक 2 वर्षांची मुलगी आहे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. (हेही वाचा: महिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट)

लोलाची आतापर्यंत 2 प्रदर्शने भरली आहेत. यामध्ये 300 डॉलर पासून ते 2800 डॉलर पर्यंत तिची चित्रे विकली गेली. लोलाच्या चित्रांचे इन्स्टाग्राम खातेही आहे. ज्यांना तिच्या प्रदर्शनांना भेटी देणे जमत नाही असे लोक इथे तिची चित्रे विकत घेतात.