प्रवासाच्या घाईगडबडीत सामान विसरणे, हे अगदी सामान्य आहे. तुमच्या आमच्यापैकी अनेकजणांसोबत असा प्रसंग किमान एकदा तरी घडला असेल. पण प्रवासात लहान बाळाला विसरल्याचं तुम्ही कधी ऐकलं का? पण अशीच एक घटना समोर आली आहे.
एक महिला चक्क आपल्या मुलाला विमानतळावरच विसरुन विमानात बसली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर आपण आपले बाळ विमानतळावरच विसरल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने आकांत सुरु केला. महिलेची परिस्थिती लक्षात घेत वैमानिकाने प्रसंगावधन राखत विमान मागे परतवण्याची परवानगी घेतली. परवानगी मिळाल्यानंतर विमान मागे वळवण्यात आले आणि आईला तिचे बाळ भेटले.
वृत्तानुसार, फ्लाइट एसव्ही 832 हे विमान जेद्दा येथून क्वालालंपूरसाठी निघाले होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एका महिलेच्या लक्षात आले की आपले मूल विमानतळावरच राहिले आहे. ही महिला अब्दुल अझीझ इंटरनॅशनल विमानतळावर आपले मूल विसरली होती. त्यानंतर तिने रडारड सुरु केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वैमानिकाने तातडीने नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधत विमानातील परिस्थितीची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. विमान प्रवासात 4 महिन्याच्या बाळाचा रडण्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून आईने लढवली अनोखी शक्कल; खास संदेशासह दिलं 'हे' गिफ्ट (Photos)
त्यानंतर एटीसीटने वैमानिकास विमान परत फिरवण्याची परवानगी दिली. परवानगी नंतर वैमानिकाने विमान माघारी फिरवले आणि आई-मुलाची भेट घालून दिली. या सर्व प्रकारानंतर वैमानिकाच्या प्रसंगावधानाचे सोशल मीडियात कौतुक होत आहे. तर मुलाला विसरण्याच्या बेजबाबरदारपणामुळे महिलेवर टीका होत असून या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.