Goodie Bag with Note from Woman passenger (Photo Credit: Facebook)

लांबचा विमान प्रवास तसा कंटाळवाणाच वाटतो आणि त्यात जर विमानात एखादं रडणारं बाळ असेल तर प्रवासात अगदी हैराण व्हायला होतं. पण तेच बाळ जर आपलं असेल तर? तर मात्र आपला दृष्टीकोन बदलतो. रडणाऱ्या बाळाबद्दल लोकांनी तक्रार न करता थोडं समजून घ्यावं, असं प्रत्येकाला वाटू लागतं. पण चार महिन्यांच्या बाळासह विमानप्रवास करणाऱ्या एका समजूतदार आईचा एक अनोखा प्रयत्न समोर आला आहे.

ही महिला साऊथ कोरियाहून (South Korea) सॅन फ्रॉन्सिस्कोला (San Francisco) प्रवास करत होती. तिच्याकडे चार महिन्यांचं बाळ होतं. मात्र विमानप्रवासात बाळाच्या रडण्याचा कोणालाही त्रास होऊ नये, म्हणून तिने अनोखी शक्कल लढवली. तिच्या या नव्या प्रयत्नाचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

या महिलेने जवळपास 200 हून अधिक कँडी आणि इअर प्लगने भरलेले पाऊचेस आणले होते. त्यावर एक छानशी नोट लिहिली होती. त्यात असे म्हटले होते की, "हॅलो...मी Junwoo आहे आणि मी 4 महिन्यांचा आहे. आज मी माझ्या आई आणि आजीसोबत मावशीला भेटायला अमेरिकेला जात आहे. मी जरा घाबरलो आहे, कारण हा माझा पहिलाच विमान प्रवास आहे. त्यामुळे रडू शकतो आणि ओरडूही शकतो. मी शांत राहण्याच पूर्ण प्रयत्न करेन, पण मी त्याबद्दल खात्री देऊ शकत नाही. कृपया माफ करा. माझ्या आईने तुमच्यासाठी एक छोटंसं पॅकेट तयार केलं आहे. यात काही कॅंडीज आणि इअरप्लग्स आहेत. मी जर जास्त आरडाओरड केली, तर तुम्ही याचा वापर करा. प्रवासाचा आनंद घ्या. धन्यवाद!"

12 फेब्रुवारीला या महिलेसह विमान प्रवास करणाऱ्या डेव्ह कोरोना (Dave Corona) या महिलेने शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट करत या नव्या प्रयत्नाची माहिती दिली.