Mangaluru Video: कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एक हृदय जिंकणारा व्हिडिओ समोर आला आहे. जेथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ऑटोचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. दरम्यान, रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेला भरधाव येणाऱ्या ऑटोचा धक्का बसला आणि ती ऑटोच्या चाकात आली. महिलेची मुलगी जवळच्याच शिकवणी केंद्रात शिकत होती, दरम्यान, मुलीने पहिले आणि तिने तत्काळ तेथे पोहोचल्यानंतर शौर्य दाखवत काही लोकांच्या मदतीने ऑटो उचलून आईचे प्राण वाचवले. या अपघाताचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुलगी काही लोकांच्या मदतीने ऑटो उचलत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेक लोक मुलीचे कौतुक करत आहे. हे देखील वाचा: CID Officer Arrested: सीआयडीचे निलंबीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांना अटक; Mahabaleshwar येथील हॉटेल व्यवसायिक फसवणूक प्रकरण
That girl deserves appreciation 🙌👏 pic.twitter.com/TO22oHk78m
— 👑Che_ಕೃಷ್ಣ🇮🇳💛❤️ (@ChekrishnaCk) September 8, 2024
येथे पाहा व्हिडीओ:
ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಅಪಘಾತ, ಓಡಿ ಬಂದು ರಕ್ಷಿಸಿದ ಬಾಲಕಿ
Mangalore Autorikshaw Accident Girl helped#mangalore #autorikshaw #viralvideo pic.twitter.com/aqGX5BLNPQ
— Hindustan Times Kannada (@HTKannadaNews) September 9, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, किन्नीगोळी येथील रामनगर भागात ही घटना घडली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक मुलीचे कौतुक करत आहेत.