गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे कर्तव्यास असलेल्या अपर पोलीस अधीक्षक श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे यास अटक अटक करण्यात आली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून तो निलंबीत होता. महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील एका हॉटेल व्यवसायिकास मद्य विक्री परवाना (Liquor License) मिळवून देण्याचे आमिष दाखवत पाच लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अटकेनंतर कोर्टासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस काठडी मिळाली. कोल्हापुरे याच्या कथीत कारनाम्यांबाबत परिसरात सुरुवातीपासूनच चर्चा होती. अखेर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्यानेच मागितली लाच
हॉटेल व्यवसायिकास मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी पाच लाखांची रक्कम कथीतरित्या घेतल्यावरही काम झाले नव्हते. त्यामुळे तक्रारदार नाराज होता. आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने थेट अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत कारवाई करण्यात आली. तक्रार अर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडे दाखल झाली. त्यांनी तातडीने तपास केले. त्यानंतर गुन्ह्याचे स्वरुप निष्पन्न होता कोल्हापुरे यास अटक करण्यात आली. तर इतर नऊ जणांवर वाई पोलीस ठाणे दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला.
मद्यविक्री परवाना देण्याच्या बहाण्याने फसवणूक
दरम्यान, या प्रकरणाचा तपास वाई पोलीस स्टेशन दप्तरी दाखल असला तरी, त्याचा तापास मात्र गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी, कोल्हापूर यांच्याकडे आहे. महाबळेश्वर येथील मेघदुत हॉटेलच्या मालकांना मद्यविक्री परवाना हवा होता. त्यासाठी ते माहिती घेत होते आणि प्रयत्नही करत होते. दरम्यान, त्यांची भेट श्रीकांत कोल्हापूरे याचे मित्र हणमंत मुंढे यांच्याशी झाली. कोल्हापुरे, मुंढे आणि त्यांच्या इतर हसाऱ्यांनी तक्रारदाराचा (हॉटेल मालक) विश्वास संपादन केला. तसेच, मद्यपरवाना मिळवून देतो मात्र, त्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले.
धक्कादायक म्हणजे आरोपींनी तक्रारदाराकडून 1 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम प्राप्त केली. त्यातील काही रक्कम चेकद्वारे तर काही रोख स्वरुपात घेतली. मात्र, त्यास मद्यविक्री परवाना मात्र दिला नाही. पैसे देऊनही काम न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हॉटेल मालकाने थेट पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार केली. हॉटेल मालकाकडून तक्रार प्राप्त होताच अर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. प्रकरणाचा वेगाने तपास करत श्रीकांत कोल्हापूरे याच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला.
काही आरोपींना या आधीच अटक
दरम्यान, या प्रकरणात हणमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे व बाळू बाबासाहेब पुरी या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.