'Ammi' and 'Abbu' Row: मुलांनी ‘अम्मी’, ‘अब्बू’ संबोधताच पालकांना धक्का, शालेय पाठ्यपुस्तकातील धड्याचा प्रभाव असल्याचा दावा, वाचा सविस्तर
School Students | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

डेहराडून (Dehradun Parents) राज्यातील शाळेत शिकणाऱ्या एका पाल्याच्या पालकांनी जिल्हा दंडाधिकारी कर्यालयाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकात (Class 2 Textbook) गुलमोहर भाग-2 मध्ये (Gul Mohar 2) असलेला धडा वगळण्यात यावा अशी मागणी केली आहे. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलाने आपल्याला 'अम्मी' आणि 'अब्बू' अशी हाक मारत संबोधू लागला आहे. ज्यामुळे आपल्याला मोठा धक्का बसला. शालेय पाठ्ठ्य पुस्तकात असलेला धड्यातील उल्लेखामुळेच आपल्या पाल्यावर प्रभाव पडल्याचा पालक मनीष मित्त यांचा दावा आहे. मनीष मित्तल हे पाल्याचे वडील आहे. मित्तल यांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे रीतसर तक्रारही केली आहे.

मनीष मित्तल यांनी दावा केला आहे की, माझ्या मुलाने एक दिवस अचानक मला अब्बू आणि माझ्या पत्नी, म्हणजेच त्याच्या आईस अम्मी म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली.आमच्यासाठी हे भलतेच धक्कादायक होते. आम्ही त्याला विश्वासात घेऊन विचारले तर त्याने आम्हाला इंग्रजीचे पुस्तक दाखवले. ओरिएंट ब्लॅक स्वान, हैदराबाद द्वारा प्रकाशित गुल मोहर भाग 2 मधील पहिल्या प्रकरणात 'अम्मी' आणि 'अब्बू' हे अनुक्रमे आई आणि वडिलांसाठी वापरले गेले आहेत. यात 'अम्मी: आई' आणि 'अब्बू:' असे शब्द स्पष्ट केले आहेत, त्यातूनच त्याने प्रेरणा घेतली आणि आम्हाला असे संबोधण्यास सुरुवात केली असे, वडीलांनी म्हटले आहे. (हेही वाचा, NCERT ने राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून हटवला गांधी हत्या, RSS, नथुराम गोडसे चा इतिहास)

वडील मनीष मित्तल यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, सर्वासाधारणपणे हिंदी पुस्तकांमध्ये ‘माता’, ‘पिता’ आणि उर्दू पुस्तकांमध्ये ‘अम्मी’ आणि ‘अब्बू’ वापरावेत. पण इंग्रजी पुस्तकात पालकांचा उल्लेख करण्यासाठी ‘अम्मी’ आणि ‘अब्बू’ वापरणे अयोग्य आहे. गुल मोहर-2 हे पुस्तक केवळ डेहराडूनमध्येच अभ्यासले जात नाही, तर देशभरातील सर्व ICSE शाळांमध्ये शिकवले जाते. इंग्रजी हा शाळांच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि अशा चुकीच्या प्रथा बंद केल्या पाहिजेत. ही एक गंभीर बाब आहे आणि आमच्या श्रद्धा आणि धार्मिक श्रद्धांवर गंभीर हल्ला आहे,” असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

मित्तल हे जे शेतकरी आहेत. त्यांनी "अशा धर्मविरोधी कृत्ये" रोखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले. जिल्ह्यात पुस्तकावर बंदी घालण्याची विनंती त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हा दंडाधिकारी सोनिका यांनी तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.