National Council of Educational Research and Training कडून बारावीच्या राज्यशास्त्र च्या पुस्तकातून आरएसएस, महात्मा गांधी यांचा हत्याकांड, तसेच हिंदू-मुस्लमान समाजात तेढ वाढेल अशा घटनांचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. मागील वर्षी देखील एनसीईआरटी कडून इयत्ता 6वी ते 12वीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. 'Rise of Popular Movements','Era of One Party Dominance','Politics in India since Independence हे विषय टाळण्यात आले आहेत. दहावीच्या अभ्यासक्रमातूनही 'Democracy and Diversity', 'Popular Struggles आणि Movements', and 'Challenges to Democracy'हे धडे काढून टाकण्यात आले आहेत.
दरम्यान मागील 15 वर्षांपासून नथुराम गोडसे चा उल्लेख 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पुण्याचा ब्राम्हण असा करण्यात आला होता. गांधी हत्येशी निगडीत हा उल्लेख देखील आता काढून टाकण्यात आला आहे.
NCERT,च्या माहितीनुसार गोडसेची जात नमूद केल्याने अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. शाळांच्या पुस्तकांमध्ये विनाकारण जात नमूद करणं चूकीचं असल्याचं सांगत ते टाळण्यात आले आहे.
Minister of State for Education Annapurna Devi यांनी संसदेमध्ये बोलताना कोरोना काळात कमी झालेला अभ्यास आता आता पुढील वर्गात त्यामुळे येणारा त्राण कमी करण्यासाठी हा अभ्यासक्रम कमी केल्याचं सांगण्यात आलं आहे. NCERT Director Dinesh Prasad Saklani यांनी कोविड नंतर विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि समाज, देश यांच्याप्रति कर्तव्य म्हणून काही अभ्यासक्रम टाळण्यात आला आहे. पण विशिष्ट विचारधारेला पाठिंबा देण्यासाठी हा अभ्यासक्रम टाळण्यात आल्याचे आरोप त्यांनी फेटाळले आहेत.
NCERT ची नवी पुस्तकं आगामी अभ्यासक्रमांमध्ये येतील. मागील वर्षी अनेक चॅप्टर्स आणि फॅक्ट्स काढून टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक विषयांचा समावेश आहे. आता नव्या बदलांसह अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार आहे.