Amit Shah | Twitter

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या बहिणीचं मुंबई (Mumbai) मध्ये निधन झालं आहे. राजेश्वरीबेन (Rajeshwariben) या अमित शाह यांच्या मोठ्या भगिनी होत्या. मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, त्यांच्यावर lung transplant procedure काही महिन्यांपूर्वी झाली होती. याबाबतच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज (15 जानेवारी) त्यांचं निधन झालं आहे. आता त्यांच्या अंत्यविधीसाठी आणि शाह कुटुंबाला आधार देण्यासाठी अमित शाह मुंबई मध्ये येणार आहेत.

अमित शाह यांनी बहिणीच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांचे गुजरात मधील दोन दिवसांचे दौरे रद्द केले आहेत. त्यांचा बानस डेअरी आणि राष्ट्रीय रक्षा विद्यापीठामध्ये कार्यक्रम होते. यावेळी ते लोकांना भेटणार होते. मात्र बहिणीच्या निधनाचं वृत्त येताच हे दौरे रद्द झाले आहेत.

पहा ट्वीट

अमित शाह यांच्या भगिनी 65 वर्षांच्या होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'त्यांचे जाणे हे समस्त शाह कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमितभाई आणि समस्त शाह कुटूंबियांना मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. राजेश्वरीबेन शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली!' असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.