देशभरात कोविडच्या रुग्णांसह मृतांचा आकडा हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही राज्यांनी कोरोना संबंधित निर्बंधांमध्ये शिथीलता आणली आहे. अशातच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) देशातील सर्व संरक्षित स्मारकांसह संग्रहालये येत्या 16 जून पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार 3693 स्मारके आणि 50 संग्रहालये पुन्हा एकदा सुरु केली जाणार आहेत. ही स्मारके कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे 15 जून पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. यापूर्वी सरकाने ती 31 मे पर्यंत बंद ठेवावीत असे आदेश दिले होते.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, आज सांस्कृति मंत्रालयाने एसएसआयची सर्व स्मारके 16 जून 2021 पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पर्यटकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. सर्वांना शुभेच्छा!(आता वाहन परवानासाठी RTO मध्ये ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही; पहा काय आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवा नियम)
Tweet:
आज @MinOfCultureGoI ने @ASIGoI के सभी स्मारकों को 16 जून 2021 से विधिवत खोलने की स्वीकृति प्रदान की है ।पर्यटक कोरोना नियमों का पालन करते हुए स्मारकों का भ्रमण कर सकते हैं ।सभी को शुभकामनाएँ @PMOIndia @JPNadda @incredibleindia @tourismgoi @NMANEWDELHI @ngma_delhi @NMIHACM pic.twitter.com/zJYAXTfNE7
— Prahlad Singh Patel (@prahladspatel) June 14, 2021