 
                                                                 हल्ली अपघाताचं प्रमाण फारचं वाढलयं. प्रशासनाकडून आवश्यक ते वाहतूक नियम तसेच तरतूदी करण्यात येतात. तरीही अनेक भीषण अपघात (Accident) होताना दिसतात. कार ड्राईव्ह (Car Drive) करताना सिटबेल्ट (Seat Belt), वाहतूक स्पीड लिमीट (Speed Limit), वाहन परवाना या सगळ्या नियमावली असतानाही अपघाता मागचं कारणं ठरतं ते दारु पिवून केलेली ड्रायविंग (Driving). बरेचदा दारु पिवून गाडी चालवणं अनेककांच्या जीवावर बेततं. म्हणून यासंबंधी देखील प्रशासनाकडून वेगळे नियम (Traffic Rules) जारी करण्यात आले आहेत. तरी बरेच बहाद्दर चोरी लपीने गाडी चालवण्याचं धाडस करतात आणि स्वतच्या जीवाबरोबर इतरांचा जीव धोक्यात टाकतात. तरी अशाच उपद्रवींसाठी कारमध्ये एक नवं फिचर लॉंच (Launch) करण्यात येणार आहे. ज्यामुळे लपून छपून दारु पिण्याऱ्यांना चांगलाचं छडा मिळणार आहे.
आता नव्याने लॉंच करण्यात येणाऱ्या कारमध्ये एक विशेष फिचर (Feature) असणार आहे. ज्यानुसार दारुच्या नशेत असलेला माणूस जर ड्राईविंग सीटवर (Driving Seat) बसला तर गाडीत जोराने अलार्म (Alarm) वाजणार आहे. या नवीन फिचरला ड्रींक डिटेक्शन सिस्टिम (Drink Detection System) असं नाव देण्यात आलं आहे. ही डिटेक्शन सिस्टिम सर्व प्रकारच्या कार्सच्या (Cars) सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड फीचर (Standard Feature) म्हणून वापरण्यात येण्याची शक्यता आहे. या डिटेक्शन सिस्टिमसाठी (Detection System) कारमध्ये अनेक कॅमेरे (Camera) आणि सेन्सर्सचा (Sensors) वापर केला जाणार आहे. (हे ही वाचा:- Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलला आजपासून सुरुवात, मिळवा 70 टक्क्यांपर्यत सुट)
ड्रींक डिटेक्शन फिचर (Drink Detection) असणाऱ्या कार अमेरिकेतील (America) राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाने विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे. लवकरचं हे तंत्रज्ञान अमेरीकेत वापरण्यात येणार आहे. तर भारतातील (Indian Traffic) वाहतूक किंवा इथे होणारे अपघात बघता यांसारख्या तंत्रज्ञानाची अधिक गरज आहे. तरी भारतीय परिवहन सुरक्षेने देखील या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अपघाताचं प्रमाण कमी करण्यास मदत होईल.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
