ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांचे बंधू आणि आमदार अकबरुद्दीन औवैसी (Akbaruddin Owaisi) हे गेल्या काही काळापासून प्रक्रतिच्या कारणामुळे अस्वस्थ आहेत. त्यांच्यावर लंडन येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी नागरिकांना अवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या बंधुंच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी. दारुसलम येथील ईद मिलाप कार्यक्रमादरम्यान आयोजित कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना असदुद्दीन ओवैसी यांनी आपले बंधू असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.
असदुद्दीन ओवैसी हे हैदराबाद चंद्रयानगुट्टा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. अकबरुद्दीन यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना असदुद्दीन म्हणाले, मी आपल्याला ईदच्या शुभेच्छा देतो. तसेच, आपल्याला प्रार्थना करतो की, अकबरुद्दीन यांच्यासाठी अल्लाकडे प्रार्थना करा. ते उपचारासाठी गेले आहेत. त्यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. अल्ला त्यांची काळजी घेईल आणि त्यांना लवकर बरे करेन, असेही ओवैसी म्हणाले.
दरम्यान, अकबरुद्दीन ओवैसी यांना तीन दिवसांपूर्वी पोटदुखी आणि उलटीचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांना एका घटनेत गोळी लागली होती. त्यानंतर त्यांच्यावर चाकूहल्लाही झाला होता. अमर उजालाच्या हवाल्याने जनसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारातील गोळीचे तुकटे अकबरुद्दीन औवैसी पाठीच्या हाडकांमध्ये विखुरले आहेत. ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही ट्विट करुन अकबरुद्दीन ओवैसी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. औवैसी कुटुंबियांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबरुद्दीन औवैसी हे या आधीही आपल्यावरील उपचारासाठी विदेशात जात होते. नुकतेच ते हज साठी सौदी अरब येथे गेले होते. त्यानंतर ते लंडनला गेले. (हेही वाचा, Telangana Election 2018: पंतप्रधान नरेंद्र मोदी चहावाल्यासारखे वागू नका: अकबरूद्दीन ओवेसी)
ट्विट - जगमोहन रेड्डी , मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
Praying for the speedy recovery and good health of Akbaruddin Owaisiji.
— YS Jagan Mohan Reddy (@ysjagan) June 11, 2019
अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर लोकसभा निवडणुकीपासून लंडन येथे उपचार सुरु आहेत. अकबरुद्दीन ओवैसी हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत आले होते.गेल्या वर्षी हैदाराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.