Air India | (Photo Credits: Facebook)

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर दैनंदिन जीवन जुन्या मार्गावर परतले आहे. जेव्हा जीवन सामान्य होते, तेव्हा अनेक कंपन्या त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी दररोज नवीन ऑफर लाँच करत असतात. अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एअरलाइन्स तिकीट बुकिंगवर अनेक प्रकारच्या ऑफर देत आहेत. पण सावधान! कोणत्याही ऑफर अंतर्गत तिकीट बुक करण्यापूर्वी, ती ऑफर नीट तपासा. कारण काही बनावट वेबसाइट चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत.

अशाच एका ऑफरबाबत एअर इंडियाने अलर्ट जारी केला आहे. नुकतेच टाटा समूहात सामील झालेल्या एअर इंडियाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबद्दल सांगितले आहे की एअर इंडियाकडून कोणतीही मोफत तिकीट ऑफर चालवली जात नाही. एअर इंडियाचे म्हणणे आहे की त्यांनी Builder.ai नावाची कोणतीही कंपनी तयार केलेली नाही.(Russia-Ukraine Crisis: युक्रेनमधील विद्यार्थी मायदेशी परतणार, सुरक्षित परतीसाठी सरकारकडून चार्टर्ड उड्डाणे सुरू करण्यास प्रोत्साहन)

Builder.ai कंपनी प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये एक मोहीम चालवत आहे आणि दावा करत आहे की कंपनीने एअर इंडियासाठी अॅप प्रोटोटाइप विकसित केला आहे. जाहिरातीसोबत QR कोडही देण्यात आला आहे. प्रोटोटाइप अॅप डाउनलोड करण्याची लिंक या QR कोडद्वारे दिली आहे. या जाहिरातीमध्ये एअर इंडियाच्या मोफत तिकीट बुकिंगबद्दल बोलले जात आहे. Builder.ai कंपनीच्या जाहिरातीत दावा करण्यात आला आहे की जे हे अॅप डाउनलोड करतील त्यांना एअर इंडियाचे मोफत तिकीट जिंकण्याची संधी मिळेल.

जर तुम्हीही अशी जाहिरात पाहिली असेल तर त्यापासून अंतर ठेवा, असे एअर इंडियाने म्हटले आहे. विमान कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून कोणतेही मोफत तिकीट दिले जात नाही. Builder.ai ने केलेला दावा पूर्णपणे बोगस आहे आणि त्यात पडण्याची गरज नाही.

एअर इंडियाने म्हटले आहे की, हे अॅप एअर इंडियाचा लोगो नक्कीच दाखवत आहे, पण ते विकसित करण्यात एअर इंडियाचा हात नाही. या अॅपद्वारे कोणाचीही फसवणूक झाल्यास त्याला एअर इंडिया जबाबदार राहणार नाही.