Photo Credit- X

L&T Chairman SN Subrahmanyan:  सध्याच्या धावपळीच्या जगात शांततेत जीवन जगण्याची प्रत्येकाला अपेक्षा असते. मात्र, मोठमोठे उद्योगपती त्यांच्या विधानांनी सर्वसामान्य नोकदाराची झोप उडवत असल्याचे वक्तव्य करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती  (NarayanaMurthy) यांनी तरूणांना 'आठवड्यातून 70 तास काम करण्याचा' सल्ला दिला होता. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत एल अँड टीचे(Larsen And Toubro) अध्यक्ष एसएनसुब्रमण्यम (S N Subrahmanyan) यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दोन्ही उद्योगपती लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. सोशल मिडीयावर त्यांच्या विधानावर रोष व्यक्त केला जात आहे. (3-Shift Work: 'इन्फ्रा सेक्टर कर्मचाऱ्यांनी 3 शिफ्टमध्ये काम करावे, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 शिफ्टने विकास नाही'- Narayana Murthy)

कर्मचाऱ्यांशी अलिकडेच झालेल्या ऑनलाइन संवादादरम्यान, सुब्रमण्यम यांना विचारण्यात आले की अब्जावधी डॉलर्सची ही कंपनी शनिवारीही कर्मचाऱ्यांना का फोन करते. यावर सुब्रमण्यम म्हणले की, 'रविवारी मी तुम्हाला कामावर आणू शकत नाही याचे मला वाईट वाटते, जर मी तुम्हाला रविवारीही कामावर आणू शकलो तर मी अधिक आनंदी होईन, कारण मी रविवारी काम करतो.' असे म्हणत त्यांनी जास्त वेळ काम करण्याचा सल्ला दिला.

या अंतर्गत बैठकीचा व्हिडिओ रेडिटवर शेअर करण्यात आला आणि व्हायरल झाल्यानंतर, त्यांच्या विधानावर वादविवाद सुरू झाला आहे. राष्ट्रीय ते जागतिक स्तरावर कामाच्या जीवनातील संतुलनावर चर्चा सुरू असताना, एल अँड टीच्या अध्यक्षांच्या विधानाने आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.(A Businessman Died of A Heart Attack: व्यायामादरम्यान एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,घटनेचा भयानक व्हिडिओ आला समोर)

'घरी बसून काय करता?'

कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे शेवटचे दिवस घरी घालवण्याचा विचार त्यांनी नाकारला. त्यावर त्यांनी प्रश्न विचारला की, "तुम्ही घरी बसून काय करता?" तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ पाहू शकता? तुमची बायको तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याचे आणि कामावर परतण्याचे आवाहन करताना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला.

आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला

त्या टिप्पणीनंतर, सुब्रमण्यम यांनी त्या संभाषणाची तुलना चीनमधील एका माणसाशी झालेल्या संभाषणाशी केला. ते म्हणाले की, चिनी माणसाने असा दावा केला की जागतिक स्पर्धेत अमेरिकेला मागे टाकण्यासाठी चिनी कामगार आठवड्यातून 90 तास काम करतात, तर अमेरिकन फक्त 50 तास काम करतात.

विधानावर टीका

सुब्रमण्यम यांच्या या कमेंटमुळे ऑनलाइन खूप चर्चा झाली. विशेषतः रेडिटवर व्हिडीओ शेअर झाल्यानंतर. अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या विधानाशी असहमती व्यक्त केली. एका टीकाकाराने सुब्रमण्यम यांची तुलना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याशी केली. त्यांनी तरुण कामगारांनी राष्ट्र उभारणीसाठी आठवड्यातून ७० तास काम करावे असे सुचवल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले होते. एका वापरकर्त्याने म्हटले, '...आणि इथे मला वाटते की एल अँड टी ही एक चांगली कंपनी आहे, असे दिसते की प्रत्येकजण नारायण मूर्तीच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.' सुब्रमण्यम यांच्या विधानावर त्यांनी निराशा व्यक्त केली.