(File Image)

ABP-CVoter Exit Poll Results 2023 Live Streaming: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आज (10 मे) सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान पार पडत आहे. दरम्यान, सायंकाळी मतदानाचा अवधी संपला की जनतेचा कौल कोणाच्या बाजून असू शकतो याबाबत एक्झीट पोल्स आपले अंदाज व्यक्त करतात. हे अंदाज म्हणजे निवडणुकीचा निकाल नसतो. पण, साधारण जनमत कोणाच्या बाजूने असू शकेल याबाबत घेतलेला तो एक कानोसा असतो. विधानसभा मतदानाच्या निमित्ताने विविध संस्था एक्झीट पोल घेत असतात. एबीपी-सीव्होटर यांनीही अशा प्रकारचा एक्झीट पोल घेतला आहे. कर्नाटक एक्झिट पोल निकाल 2023 लाइव्ह स्ट्रीमिंग (Karnataka Exit Poll Results 2023 Live Streaming) आपण येथे पाहू शकता.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, प्रादेशिक राजकीय पक्षांसह विविध संघटना आणि अपक्षांसह 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. हे सर्व उमेदवार हे एकूण 224 जागांसाठी आपले नशीब आजमावत आहेत.

कर्नाटक एक्झिट पोल निकाल 2023 लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

कर्नाटक विधानसभा एबीपी माझा एक्झिट पोल

एकूण उमेदवारांपैक पुरुष उमेदवारांची संख्या 2,430 इतकी. तर महिला उमेदवारांची संख्या 184 इतकी आहे. ट्रान्सजेंडर समूहातून केवळ एक उमेदवार आहे. दुसऱ्या बाजूला एकूण मतदारांची संख्या 5,31,33,054 आहे. त्यापैकी 2,67,28,053 पुरुष तर, 2,64,00,074 महिला आणि 4,927 इतर श्रेणीतील मतदार आहेत.