School Admission And Aadhaar: शालेय प्रवेश अथवा इतर कोणत्याही शालेय गोष्टींसाठी आधार अनिवार्य नाही, असे ओडिशा शाळा आणि जनशिक्षण विभागाने मंगळवारी (8 ऑगस्ट) स्पष्ट केले. काही शाळांमध्ये शालेय प्रवेशासाठी आधार क्रमांकांची सक्ती केली जात आहे. ज्यामुळे पालकांना नाहक त्रास होतो, हे निदर्शनास आल्यानंतर ओडिशा शाळा आणि जनशिक्षण विभागाने हा खुलासा करण्यात आला आहे. या विभागाने सांगितले की, शालेय प्रवेशांसाठी आधारकार्ज जमाकरणे अनिवार्य नाही. काही शाळांचे मुख्याध्यापक विनाकारण पालकांना आधार कार्डसाठी सक्ती करतात.
विद्यार्थी आणि पालकांना शाळांकडून आधार कार्डसाठी सक्ती, अथवा अनिवार्यता करण्यात येऊ नये, यासाठी सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना (DEOs) विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवेशासाठी सर्व मुख्याध्यापकांशी संवाद साधण्यास सांगितले आहे, अशी माहिती ओडिशाच्या शाळा आणि जनशिक्षण विभागाचे सचिव अवस्थी एस यांनी दिली आहे. तसेच, ज्या शाला आधार कार्डसाठी पालकांना सक्ती करतील त्यांना योग्य ती समज देण्यात यावी, असेही या विभागाने म्हटले आहे. शालेय व जनशिक्षण विभागाने असे नमूद केले आहे की, प्रवेशानंतर, जिल्ह्यातील विविध कार्यालयांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते आणि प्रवेशासाठी आधार ही अनिवार्य अट नाही.
आधार हा भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) द्वारे जारी केलेला 12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे. जो भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापित केलेला वैधानिक प्राधिकरण आहे. आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली आहे आणि ती भारतातील रहिवाशांची ओळख प्रस्थापित करण्याचे एक साधन आहे. प्रत्येक आधार क्रमांक युनिक असतो आणि व्यक्तींसाठी त्यांच्या बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक डेटावर आधारित डिजिटल ओळख म्हणून काम करतो. आधार नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता यासह लोकसंख्याशास्त्रीय डेटासह बोटांचे ठसे आणि बुबुळ स्कॅन यांसारखी बायोमेट्रिक माहिती कॅप्चर आणि संग्रहित करते. आधारचा वापर प्रमाणीकरणासाठी केला जातो, ज्यामुळे व्यक्तींना त्यांची बायोमेट्रिक किंवा लोकसंख्याशास्त्रीय माहिती वापरून त्यांची ओळख सिद्ध करता येते. हे प्रमाणीकरण विविध सेवांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की बँक खाती उघडणे, सरकारी अनुदानासाठी अर्ज करणे आणि बरेच काही.