सेवा वितरणासाठी आधार आधारित चेहऱ्यावरुन ओळख प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) व्यवहारांना जोरदार गती मिळाली असून ऑक्टोबर 2021 मध्ये याचा आरंभ झाल्यापासून मे मध्ये या पध्दतीच्या मासिक व्यवहारांनी 10.6 दशलक्ष इतका उच्चांक गाठला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात 10 दशलक्षाहून अधिक फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची नोंदणी झाली आहे.फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या सतत वाढतच आहे आणि जानेवारी 2023 मध्ये नोंदवलेल्या अशा व्यवहारांच्या तुलनेत मे महिन्यात झालेल्या व्यवहारांच्या मासिक संख्येत 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जे त्याचा वाढीव वापर दर्शवते. पॅन क्रमांक आधार सोबत कसे लिंक करायचे? लिंक नसेल तर काय होईल? घ्या जाणून
भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ,UIDAI) यांच्या द्वारे इन-हाउस विकसित केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता/मशिनरी प्रशिक्षण (AI/ML) यावर आधारित फेस ऑथेंटिकेशनची पध्दत, आता राज्य सरकारी विभाग, केंद्र सरकारमधील मंत्रालये आणि काही बँकांसह 47 संस्था वापरत आहेत.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,पीएम किसान योजना यातील लाभार्थ्यांच्या प्रमाणीकरणासाठी तसेच निवृत्तीवेतनधारकांद्वारे घरच्या घरी डिजिटल हयात प्रमाणपत्रे तयार करण्यासाठीही याचा उपयोग केला जात आहे;अनेक सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आणि काही आघाडीच्या बँकांमध्ये त्यांच्या व्यवसाय प्रतिनिधींद्वारे बँक खाती उघडण्यासाठी याचा वापर केला जात आहे.
फेस ऑथेंटिकेशन वापरण्याची ही पद्धत सुलभ असून, जलद प्रमाणीकरण यासारखी वैशिष्ट्ये प्रदान करते आणि बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट) आणि ओटीपी प्रमाणीकरण यासह प्रमाणीकरण करण्याच्या यशस्विततेचाचा दर वाढविण्यासाठी अतिरिक्त पद्धती म्हणून याला प्राधान्य दिले जात आहे. हे प्रमाणीकरण प्रतिमा थेट नोंदवते. हे कोणत्याही व्हिडिओ परत बनविण्याच्या प्रक्रियेपासून आणि असामाजिक घटकांद्वारे स्थिर फोटो प्रमाणीकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सुरक्षित आहे.
ज्येष्ठ नागरिकांना किंवा हाताने काम करण्याच्या किंवा इतर आरोग्य समस्यांमुळे ज्यांना त्यांच्या बोटांच्या ठशांच्या गुणवत्तेबाबत समस्या येतात,अशा सर्वांना मदत करत ,फेस ऑथेंटिकेशन हा एक मजबूत पर्याय म्हणून काम करत आहे. लोकांच्या विनंतीवरून मे महिन्यात यूआयडीएआयने( UIDAI) 14.86 दशलक्ष आधार कार्ड अद्ययावत केली. आधार ई-केवायसी सेवा पारदर्शक आणि उत्तम ग्राहक अनुभव प्रदान करून आणि व्यवसाय करणे सुलभ करण्यात मदत करून बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. एकट्या मे महिन्यात 254 दशलक्षहून अधिक ई-केवायसी व्यवहार झाले.
मे 2023च्या अखेरीस, आधार ई-केवायसी व्यवहारांची एकत्रित संख्या 12.2 अब्जच्या पुढे गेली आहे. ई-केवायसीचा सतत अवलंब केल्याने वित्तीय संस्था, दूरसंचार सेवा प्रदात्यांसारख्या संस्थांचा ग्राहक संपादन खर्च लक्षणीयरीत्या कमी होत आहे.
समग्र बँकिंगसाठी एईपीएस असो, ओळख पडताळणीसाठी ई-केवायसी असो, थेट निधी हस्तांतरण किंवा प्रमाणीकरणासाठी आधार सक्षम डीबीटी असो, आधार, भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा पाया आणि सुशासनाचे साधन बनले असून, जीवन सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.