कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे 24 मार्चपासून देशात लॉक डाऊन (Lockdown) सुरु आहे. लॉकडाऊनला आता 7 आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे आणि लोक 17 मे नंतर लॉकडाऊन संपण्याची अपेक्षा करीत आहेत. लॉकडाऊननंतर आयुष्य कसे असेल याबद्दल अनेक कयास लावले जात आहेत. दरम्यान, लॉक डाऊननंतर ऑफिसला जाण्यासाठी देशातील 95 टक्के भारतीय चिंतेत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने लॉक डाऊन संपल्यावरही ऑफिसला जाण्याचा तणाव लोकांवर असल्याचे दिसून आले आहे.
त्याचबरोबर, 85 टक्के कर्मचार्यांची इच्छा आहे की ते पुन्हा कामावर परत येण्यापूर्वी, संपूर्ण कार्यालय परिसर स्वच्छ केला जावा. हे सर्वेक्षण 560 कंपन्यांच्या कर्मचार्यांवर हेल्थ-टेक कम्युनिटी प्रोडक्ट एफवायआयआय आणि माइंडमॅप अॅडव्हान्स रिसर्चने (MindMap Advance Research) केले आहे. यात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये कार्यरत लहान, मध्यम आणि मोठ्या संघटनांचे कर्मचारी देखील आहेत. कंपनीने सर्वेक्षण केलेल्या कर्मचार्यांपैकी 85 टक्के कर्मचारी पुरुष आणि 15 टक्के महिला आहेत. सर्वेक्षणात उघड झालेल्या आकडेवारीनुसार 59 टक्के कर्मचारी आपल्या आरोग्याबद्दल चिंतेत आहेत, 25 टक्के कर्मचार्यांनी सांगितले की ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे घाबरले आहेत, तर 16 टक्के लोक या आपत्तीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीखाली आहेत.
Coronavirus Outbreak: भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ५२९५२, तर महाराष्ट्रात १२२३ नव्या रुग्णांची भर - Watch Video
सर्वेक्षण केलेल्या कर्मचार्यांपैकी 85 टक्के लोक, त्यांच्या नियोक्त्यांनी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे आणि सल्लाांचे अनुसरण करण्याची अपेक्षा करत आहेत. अहवालानुसार 99 टक्के कर्मचार्यांनी सांगितले की, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रमाणेच त्यांना कॉर्पोरेट मालकांसाठी कॉर्पोरेट हेल्थ रिस्पॉन्सिबिलिटी (CHR) अनिवार्य करायचे आहे. कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या वागण्यात, आचरणात आणि विचारांमध्ये फार मोठा बदल घडला आहे. आता इथून पुढे लोक त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देतील असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.